कडकनाथ कोंबडी खाल्ली का? होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी होतोय वापर!

टीम ई सकाळ
Wednesday, 23 September 2020

कडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते.

नागपूर : आजच्या घडीला सर्वच लोक मांस खातात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुणाला कोंबडी खायला आवडते तर कुणाला मटण, कुणाला मच्छी तर कुणाला दुसर काही. रविवार हा मांसाहार करण्याच्या दिवस अशी शैकिनांची समज झाली आहे. सद्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी कोंबडी आणि अंड्याची मागणी चांगलीच वाढली आहे. चला तर जाणून घेऊया ‘कडकनाथ कोंबडी’बद्दल... साधारण कोंबडी आणि कडकनाथ कोंबडीत काय फरक आहे, तिचे फायदे काय याची माहिती खास आपल्यासाठी...

कडकनाथ हा कोंबडी मधला एक प्रकार किंवा जात आहे. कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असतो. रक्त आणि मांस पण काळेच असतात. त्यामुळे या कोंबडीचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या डोक्यावरील तुरे हे लाल असतात. शिवाय पिसांचा रंगही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. परंतु, कडकनाथ कोंबड्यांमध्ये मात्र तुरे हे काळेच असतात, हे विशेष...

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

कडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते. हे सगळ खाल्ल्याने तिच्यात औषधी गुण येतात.

कोंबडीची जोऱ्यात जाहिरात

साधारण कोंबडीच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्या आरोग्यपूरक असतात. त्यांचे मांसही रुचकर असते. त्यांची अंडीही पौष्टिक असतात. परंतु, काही लोक त्या कोंबडीला आणून बंदिस्त जागेत ठेवत आहेत. त्यांना खायला फॅक्टरीमधील अन्न देत आहेत. औषधी गुणांच्या नावाखाली विकून लोकांची फसवणूक करीत आहेत. अनेक वर्षांपासून सगळीकडे या कोंबडीची जोऱ्यात जाहिरात सुरू आहे. मध्यप्रदेशातच नव्हे तर भारतात सगळीकडे या कोंबडीची सध्या धूम आहे.

हेही वाचा - प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

झाबुआमध्ये प्रामुख्याने मिळतो कडकनाथ

कडकनाथ कोंबडी प्रामुख्याने मध्यप्रदेशातील झाबुआ भागात मोठ्या प्रमाणात मिळते. झाबुआ हा तसा आदिवासी भाग आहे. या कोंबडीचे संवर्धन करण्यात आदिवासींचा मोठा हात आहे. इथे या कोंबडीला ‘काली मासी’ही असे संबोधले जाते. मध्यंतरी झाबुआ (मध्यप्रदेश) आणि दंतेवाडा (छत्तीसगढ) या दोन राज्यात या कोंबडीच्या भौगोलिक सूचकांक मानांकनासाठी (GI) भांडण झाले होते. त्यात मध्यप्रदेश राज्याचा विजय झाला होता.

पुढीलप्रमाने आयुर्वेदिक गुणधर्म

  • कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
  • अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
  • मांसामध्ये पुरुषत्वाचे प्रमाण जास्त आहे. मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.
  • दमा, अस्तमा, टीबी या आजारावरही गुणकारी
  • मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
  • कोंबडीच्या मांस व अंडी सेवनाने हृदयविकार टाळता येतो
  • मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.
  • मधुमेहसारखा आजारही बरा होतो.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

होमिओपॅथी, मानसिक विकारासाठी वापर

कडकनाथ होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी विशेष औषधी म्हणून वापरले जाते. मेलानीन रंगद्रव्य जो कडकनाथच्या रक्तात असतो तो माणसाच्या हृदयाचा रक्त प्रवाह वाढवण्यासाठी वापरले जाते. कडकनाथ चिकन महिला वंध्यत्व, मेनोक्षेणईक (असामान्य पाळीच्या), नेहमीचा गर्भपातसाठी एक चमत्कारिक औषधी आहे. कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. कोलेस्टेराॅलचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त आहे.

जाणून घ्या - भूषणावह बाब : ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी मेडिकलमध्ये

रक्तदाब व्यक्तींसाठी अंडी खूप पौष्टिक

कडकनाथची अंडी कमजोरी, दमा, मूत्रपिंडाची सूज, तीव्र डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी प्रभाविपणे वापरले जाऊ शकते. कडकनाथच्या अंडीमध्ये कोलेस्ट्रॉल मात्रा बाकी पक्षांपेक्ष्या कमी आहे. वयस्कर लोकांना आणि उच्च रक्तदाब व्यक्तींना ही अंडी खूप पौष्टिक आहे. कडकनाथ मांस आणि अंडीप्रथिने आणि लोह (२५.४७%) दोन्हीचा एक श्रीमंत स्रोत आहे.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath chicken is beneficial for health