
रेल्वेसेवा पूर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मद्यतस्करही पुढे सरसावले आहेत. अंमलापदार्थांची तस्कारी रोखण्यासह गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी आरपीएफने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
नागपूर ः रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर करावाई करीत रेल्वेतून मद्यस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. पथकाने बेवारस अवस्थेतील मद्यसाठा हस्तगत केला. एका बॅगमध्ये दारूच्या १४० बाटल्या पडून होत्या. मद्यची ही खेप दारूबंदी असलेल्या वर्धा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्याचा तस्करांचा डाव असावा असा कयास लावला जात आहे.
रेल्वेसेवा पूर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मद्यतस्करही पुढे सरसावले आहेत. अंमलापदार्थांची तस्कारी रोखण्यासह गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी आरपीएफने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रेल्वे स्थानक व गाड्यांमध्ये आकस्मिक तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
बुधवारी सकाळी हे पथक रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर गस्त घालत होते. इटारसी एन्डच्या दिशेने एक बेवारस बॅग आढळून आली. जवळ असणाऱ्या प्रवाशांकडे बॅगेबाबत विचारणा केली असती कुणीही मालकी हक्क दाखविला नाही. बॅगमध्ये कोणतेही घातपातकी साहित्य नसल्याची खात्री करून बॅग उघडण्यात आली. त्यात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.
१२ हजार रुपये किमतीचा हा मद्यसाठा मध्य प्रदेशात निर्मित असल्याची माहिती पुढे आली आहे. कागदेपत्री कारवाईनंतर पुढील प्रक्रियेसाठी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अज्ञात व्यक्तीविरूद्ध दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, उषा तिग्गा, अश्विनी मूलतकर, श्याम झाडोकार, जितेंद्र कुमार व उपनिरीक्षक दिलीप सिंह, जगत सिंह, बी. बी. यादव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक विनोद भोयर, चंदू गोबाडे यांचा समावेश होता.
संपादन - अथर्व महांकाळ