फक्त ५० जणांच्या उपस्थितीत 'आरएसएस'चा विजयादशमी उत्सव; वाचा, चीनबद्दल काय म्हणाले मोहन भागवत

राजेश चरपे
Sunday, 25 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच आरएसएसचा विजयादशमी सोहळा मैदानात न होता सभागृहात पार पडत आहे. यावेळी ५० जणांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जनतेला संबोधित केले. करोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आलीये, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर - चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्याने चीनला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला जोरदार धक्का बसला आहे. आता भारताला सगळ्याच अर्थाने चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - सोहळा धम्मदीक्षेचा : ६४ वर्षांपूर्वी हॉटेल श्याममध्ये थांबले होते बाबासाहेब, निवासाचे बिल ११००...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच आरएसएसचा विजयादशमी सोहळा मैदानात न होता सभागृहात पार पडत आहे. यावेळी ५० जणांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जनतेला संबोधित केले. करोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आलीये, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यंदा संपूर्ण जगावर करोनाचे संकट आले आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला आहे. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे, असे भागवत म्हणाले.

हेही वाचा - तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

कटुता निर्माण होऊ नये -
२०१९मध्ये कलम ३७० हटवण्यात आले. त्याचबरोबर ९ नोव्हेंबरला न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारला. त्याचबरोबर सीएएमुळं देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे. तसंच, देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rss chief mohan bhagwat on indo china war in vijayadashmi celebration of rss in nagpur