अभिमानास्पद... नागपूरकर सचिन शिरबावीकर यांचा सायकल शर्यतीत अनोखा पराक्रम

Sachin Shirgaonkar's unique record in cycle race
Sachin Shirgaonkar's unique record in cycle race

नागपूर : नागपूरच्या सचिन शिरबावीकर यांनी 1,528 किलोमीटर अंतराची "रेस अक्रॉस वेस्ट' सायकल स्पर्धा यशस्वी पूर्ण करून अनोखा इतिहास रचला आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते देशातील सहावे व नागपूरचे पहिले सायकलपटू ठरले आहे. 

सचिन यांनी ही स्पर्धा सात दिवस तीन तासांत पूर्ण केली. सहभागी स्पर्धकांना "रेस अक्रॉस वेस्ट' स्पर्धा बारा दिवसांत पूर्ण करायची होती. परंतु, सचिन यांनी सात दिवसांतच लक्ष्य गाठले. मधुमेहाचे रुग्ण असूनही त्यांनी हे यश मिळविले हे उल्लेखनीय. प्रो-हेल्थ फाउंडेशन व माइल्स ऍण्ड मायलर्स एंड्युरन्स स्पोर्टस अकादमीच्या सहकार्याने व इंडिया पॅडल्स या संस्थेच्या प्रोत्साहनाने त्यांनी त्यात सहभाग घेतला होता.

16 ते 28 जूनपर्यंत व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या सायकल शर्यतीत जगभरातील 84 सायकलपटूंनी भाग घेतला होता. सचिनसह भारतातील सहा सायकलपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेसाठी त्यांना आई ज्योती, पत्नी अमिता आणि मुलगा श्रीधर यांचे सहकार्य लाभले. त्यांनी यशाचे श्रेय डॉ. अमित समर्थ, वैभव व गायत्री अंधारे, भूषण वासवानी, ज्योती पटेल, ऋषी सेहगल व आशीष उंबरकर यांना दिले आहे. डॉ. राजश्री व डॉ. शंतनू सेनगुप्ता व डॉ. अभिनव कन्हेर यांच्या चमूने त्यांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी सांभाळली. 

सायकल अभियानांमध्ये यशस्वी सहभाग

सचिन यांनी मागील तीन वर्षांमध्ये अनेक अर्ध मॅरेथॉन व आयर्नमॅन शर्यती यशस्वी पूर्ण केल्या आहेत. याशिवाय नागपूर-पचमढी, मनाली-लेह तसेच मुंबई-गोवा या सायकल अभियानांमध्येही यशस्वी सहभाग नोंदविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com