अरेच्चा ! पेरले ते उगवलेच नाही, काय कारण असावे बरे, वाचाच...

मनोज खुटाटे
रविवार, 21 जून 2020

नरखेड तालुक्‍यात मागील खरीप हंगामापासून रडवत असलेल्या पांढ-या सोन्यामुळे याविषयी मोठ्या
प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसीला "बायबाय' केले व सोयाबीनचा पेरा वाढविला. पण हेच शेतकऱ्यांच्या अंगलट आले व त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे निघालेच नाही. नरखेड तालुक्‍यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात 8 हजार हेक्‍टरमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. यावर्षी शेतकऱ्यांनी कपासीला पाठ दाखवित सोयाबीनचा पेरा वाढविला.

जलालखेडा (जि.नागपूर) : संकट व शेतकरी हे रसायन झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागील संकटाचा ससेमिरा काही थांबता थांबत नसल्याने शेतकरी जेरीस आला आहे. आता खरीप हंगाम कसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे. त्याने पेरलेलेले सोयाबीनच उगवलेच नसल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

आणखी वाचा : अन्‌ पोलिसांनी कानठळया बसविणा-या सायलेंससरचा काढला आवाज

अनेक हेक्‍टरमध्ये दुबार पेरणीची वेळ
नरखेड तालुक्‍यात मागील खरीप हंगामापासून रडवत असलेल्या पांढ-या सोन्यामुळे याविषयी मोठ्या
प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसीला "बायबाय' केले व सोयाबीनचा पेरा वाढविला. पण हेच शेतकऱ्यांच्या अंगलट आले व त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे निघालेच नाही. नरखेड तालुक्‍यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात 8 हजार हेक्‍टरमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. यावर्षी शेतकऱ्यांनी कपासीला पाठ दाखवित सोयाबीनचा पेरा वाढविला. यामुळे तब्बल तेरा हजार हेक्‍टरमध्ये सोयाबीनचा पेरा करण्यात आला. अजूनही काही हेक्‍टरमध्ये पेरणी होण्याची शक्‍यता आहे. सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी काही जवळचे, काही शेतकऱ्यांकडून विकत घेऊन तर काही कृषी केंद्रातून बियाणे विकत घेऊन पेरणी केली. तरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केल्यानंतर बियाणे चार ते पाच दिवसात सोयाबीन तासी लागते, पण काहीच उगवले नाही. यात मोठया प्रमाणात महाबीजच्या या वाणाचा समावेश आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर महाग बियाणे खरेदी करून पेरणी करूनही निघाले नाही. यामुळे पहिल्या पेरणीसाठी झालेला शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला . आता त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. इतकेच नव्हे तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवातही केली आहे. पहिल्याच पेरणीसाठी उधार घ्यावे लागले, तर दुबार पेरणी कशी करावी, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

हेही वाचा :  मला स्पोर्ट कोटयातून नोकरी लागली असून पुणे वारियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्‍त....

नुकसान झालेल्या शेतक-यांनी हे करावे...
त्याच लॉटचे दुसरे बियाणे उगवण झाली काय ते देखील तपासावे लागेल. कृषी सेवा केंद्राने स्टेटमेंट 1 आणि 2, खरेदी बिल, साठा रजिस्टर, विक्री रजिस्टर, प्रिन्सिपल सर्टिफिकेट परवान्यात समाविष्ट असल्याचे रेकॉर्ड व इतर आनुषंगिक अभिलेख अद्यावत ठेवावा.

हेही वाचा : आनंदाची बातमी ! कोरोनामुळे नागपूर जिल्हयाची ही समस्या काही प्रमाणात सुटेल..

पुन्हा खर्चात वाढ झाली
दोन एकरात या महाबीजच्या वाणाची पेरणी केली. पण सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे मोड करून पुन्हा पेरणी करावी लागली. यामुळे खर्चात वाढ झाली व आता पुन्हा पेरलेले ही उगवणार की नाही, अशी भीती कायम आहे.
ओमप्रकाश चांडक
शेतकरी, जामगाव

दुबार पेरणीसाठी अनुदान द्यावे
घरचे नव्हे तर दुकानातून आणलेले प्रमाणित बियाणे देखील उगवले नाही. यात बियाण्यांचा दोष आहे की निसर्गाचा, हा संशोधनाचा विषय आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकामार्फत सर्वेक्षण करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान देण्यात यावे.
वसंत चांडक
माजी सभापती, पंचायत समिती, नरखेड

कृषी अधिका-यांना कळवावे !
परिस्थितीत कृषी सहाय्यकांनी त्याच दिवशी पंचनामा करून तालुका कृषी अधिकारी यांना कळविणे अपेक्षित आहे. शेतकऱ्याकडून बील, टॅग, पिशवी, उर्वरित बियाणे, पेरणीची तारीख, बीज प्रक्रिया केली असल्यास तसे नमूद करावे. शेतकऱ्याची लेखी तक्रार असणे आवश्‍यक आहे.
डॉ. योगीराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The seed did not grow