नागपूरच्या 'गुलसितां'ची आयसीए फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड 

केवल जीवनतारे
गुरुवार, 11 जून 2020

उपाशी पोटी जगणाऱ्या शोषितांच्या यातनांच्या प्रवासात व्यवस्थेकडून होणारे शोषण आणि त्यातून भूकबळी गेल्यानंतर होणारे राजकारण, ही या लघुपटाची मध्यवर्ती कथा आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन धनविजय यांचे आहे. प्रथमच अभिनवच्या 'आफ्टम'तर्फे 'गुलसितां' लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ऑक्‍टोबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाची प्रवेशिका मंजूर झाली आहे. 

नागपूर : इंग्लंड येथील लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल ग्लोबल नेटवर्क तसेच रशियातील लाम्पा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल रशियन फेडरेशनतर्फे पुरस्कृत करण्यात आलेल्या 'गुलसितां' लघुपटाची पुणे येथील 'आयसीए फिल्म फेस्टिव्हल'मध्ये निवड झाली आहे. आंबेडकरी नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय निर्मित आणि दिग्दर्शित 'गुलसितां'चे आतापर्यंत जगातील 20 देशांत 'स्क्रिनिंग' झाले आहे. 

उपाशी पोटी जगणाऱ्या शोषितांच्या यातनांच्या प्रवासात व्यवस्थेकडून होणारे शोषण आणि त्यातून भूकबळी गेल्यानंतर होणारे राजकारण, ही या लघुपटाची मध्यवर्ती कथा आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन धनविजय यांचे आहे. अभिनव कलानिकेतन या परिवर्तनाचा वसा स्वीकारलेल्या नाट्य संस्थेच्या माध्यमातून अकिंचन, हत्याकांड, विकल्प आदी नाट्यांचे प्रयोग दिल्ली, सांगलीसह पुण्यात सादर झाले आहेत. यानंतर प्रथमच अभिनवच्या 'आफ्टम'तर्फे 'गुलसितां' लघुपटाची निर्मिती करण्यात आली. येत्या ऑक्‍टोबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाची प्रवेशिका मंजूर झाली आहे. 

या लघुपटाचे सहयोगी दिग्दर्शक सुबोध उके आहेत. सहदिग्दर्शन निर्मिती जीवनतारे यांचे आहे. सचिन सेट्टे, संजय चावरे यांनी छायाचित्रण केले आहे. मयूर सूर्यवंशी यांनी संपादन केले असून, पुष्कर देशमुख यांनी संगीत दिले आहे. तांत्रिक नियोजन मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. नितीन मरसकोल्हे, गायत्री ढोले, सक्षम गणवीर, तनुश्री वंजारी, संजय वाघमारे, राजेश शेरकी, संजय रंधे, सारनाथ रामटेके, नीलेश शंभरकर, अनिता ढेरे, प्रदीप रोंधे, अनिल प्रजापती, संग्रामसिंग ठाकूर, जितेंद्र शिंदे यांनी या लघुपटात भूमिका साकारल्या आहेत. रमेश सोमकुवर आणि अभिजित पाटील निर्मितीप्रमुख आहेत. 

हेही वाचा : किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

शनिवार 13 जून रोजी रात्री 8 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 3 वाजता 'आवाज इंडिया'वर हा लघुपट प्रदर्शित होणार आहे. हा लघुपट नागरिकांनी बघावा, असे आवाहन डॉ. मच्छिंद्र चोरमारे, रिपाइं नेते भूपेश थुलकर, डॉ. सविता कांबळे, कवी महेंद्र गायकवाड, डॉ. सुरेश वर्धे, पल्लवी वहाणे, गौरव थूल, डॉ. सुदेश भोवते, संजय गोडघाटे, गौरव थूल, अजय चालखुरे, सुमेध कांबळे यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of short film 'Gulsitan' for Film Festival