ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंनी सांगीतले देशमुखांचे गृहमंत्री होण्याचे "राज'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सपत्नीक नगरीत भव्य नागरी सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी (ता. 27) करण्यात आला.

काटोल (जि.नागपूर)  :  नगरीचे भूमिपुत्र अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री झाले. मात्र, याकरिता महाराष्ट्राचा सह्याद्री पावसात भिजला. त्यामुळे हे सरकार आले अन्‌ अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केले.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सपत्नीक नगरीत भव्य नागरी सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी (ता. 27) करण्यात आला.

क्‍लिक करा  :  सावधान ! तुमच्याही भूखंडाचा होउ शकतो लिलाव
यावेळी राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, अनुप खराडे, गणेश चन्ने, अयुब पठाण, आजी-माजी मंत्री, या मतदारसंघातील सर्व जि.प.सदस्य, काटोल-नरखेड पंचायत समितीचे सभापती-उपसभापती, पं.स.सदस्य काटोल, नरखेड तालुक्‍यातील ग्रा.पं.चे सरपंच-उपसरपंच तसेच ग्रा.पं.सदस्य, सोबतच काटोल-नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, मतदारसंघातील समाजसेवी, व्यापारी, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक, धार्मिक, संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व आरतीताई देशमुख यांचे स्वागत केले. अनेक मान्यवरांनी देशमुख यांच्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी केले.
क्‍लिक करा  : पदवीधर निवडणुकीच्या नोंदणीविषयी उदासीनता

अवैध सावकारीवर लगाम आणू  :  अनिल देशमुख
मी आजपर्यंत नागरी सत्कार स्वीकारला नाही. काटोलच्या नागरिकांनी, अराजकीय नागरिकांनी एकत्र येत सत्कार समितीची स्थापना केली. त्यामुळे मी या नागरी सत्काराचे निमंत्रण स्वीकारले. माझ्या सत्कारात या मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे सोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार साहेबांचे आभार मानतो. मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा हा सत्कार असल्याचे याप्रसंगी गृहमंत्री देशमुख म्हणाले. गृहखात्याची फार मोठी जबाबदारी असते. पोलिस खात्याचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावरही फार ताण असतो. त्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन व "क्राइम कॅपिटल' म्हणून नागपूरला लागलेला डाग पुसण्याचा प्रयत्न करणार. नागपूर, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढू, शेतकरी सावकारीच्या तक्रारी आल्या तर संबंधितांवर गुन्हा दाखल करू. अवैध सावकारी मोडून काढू. जनता दरबार सुरू करू. मोर्चातील शेतकरी बंधूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior journalist Madhukar Bhave tells secret to become Deshmukh's Home Minister