'सरकारी काम आणि महिनाभर थांब'! गेल्या पाच दिवसांपासून सर्व्हर बंद; दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार   

server down in government office from last 5 days
server down in government office from last 5 days

नागपूर : सरकारी काम आणि महिनाभर थांब, असे म्हटल्या जाते. सेवा हमी कायदा करूनही शासकीय कार्यालयांची ही प्रतिमा बदलण्यास कोणत्याही शासनकर्त्यांना यश आले नाही. याचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होतो. कर्मचाऱ्यांना वेतन नियमित मिळत असले तरी सर्वसामान्यांना रोजगार सोडून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.

कळमेश्वर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दस्त लागत नसल्याने लोकांना तासनतास थांबल्यावरही काम होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. मात्र याची दखल गांभीर्याने कोणी घेत नाही.

जेव्हा सुरू होईल तेव्हा या असे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे. राज्य सरकारने खरेदी विक्री वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्क कमी केले. मात्र येथे पाच दिवसांपासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत.

‘चिरीमिरी‘ची चर्चा

एक महिला नागपूरवरून आल्या होत्या. परंतु त्यांनीही आल्या पावली परत जावे लागले. त्यामुळे जाण्या येण्याचा त्यांचा खर्च वाया गेला. असा प्रकार अनेकांसोबत होत आहे. गरजूंना हेरून याचा फायदाही घेतल्या जात आहे. अर्ज लवकर लावण्यासाठी चिरीमिरी मागितल्या जात असल्याची चर्चा कार्यालय परिसरात आहे. गेल्या चार, पाच दिवसापासून इंटरनेट सुविधा बंद असताना ती पूर्ववत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष प्रयत्न विभागाकडून घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

वेळेसोबत पैसाही जातोयं वाया

गावातील एक जागा घ्यायची विकत घ्यायची आहे. त्याच्या रजिस्ट्रीसाठी गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. मात्र बीएसएनएलची लाइन बंद आहे. ती आल्यावर रजिस्ट्री लावतो. तो पर्यंत थांबा, असे सांगतात. तीन, चार तास थांबल्यावर लाइन आली नसल्याने आज काम होणार नसल्याचे सांगतात. त्यामुळे परत जावे लागते. वेळेसोबत पैसाही वाया जात असल्याचे प्रशांत नावाच्या व्यक्तीने सांगितले

संपादन - अथर्व महांकाळ   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com