कोरोना, लॉकडाउन, पेट्रोल दरवाढीने त्रस्त नागरिकांना आता याचा करावा लागतोय सामना...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलो या भावाने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांमधून कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत अशापैकी अनेकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे.

नागपूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेला आता रोजच्या जेवनात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर वाढल्याने घाम फोडला आहे. पदार्थाची चव वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोमॅटोने 70 रुपये किलोवर उसळी मारल्याने सर्वसामान्यांना भाजीत टोमॅटोचा वापर करणे कमी केले आहे.

लॉकडाऊनमध्ये ज्या टमाटरचे भाव 5 ते 10 रुपये किले होते. त्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील बजेट कोलमडले आहे. ठोकमध्ये टोमॅटो 50 रुपये किलोवर तर, किरकोळमध्ये 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत.

जाणून घ्या - "आई प्लीज... तो बलात्कार नव्हे... प्रेम आहे आमचे'

लॉकडाऊनमुळे आधीच लोकांची आर्थिक स्थिती खालावली असून, पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता भाज्यांचे दरही वाढल्याने गृहीणींचे किचन बजेट पुर्णपणे कोलमडले आहे. ही वाढ कायम राहणार असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. पालेभाज्यांसह काकडीच्या भावात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलो या भावाने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांमधून कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत अशापैकी अनेकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. त्यामुळे आहे त्याच उत्पन्नात जगणेही सामान्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. घरखर्च भागविणाऱ्या गृहिणींना वाढत्या महागाईच्या काळात कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्‍न पडला आहे.

अधिक माहितीसाठी - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगळ ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

घर चालविण्यासाठी प्रत्येक बाबींच्या खर्चाचे बजेट ठरलेले असते. त्यापेक्षा जास्त खर्च करणे त्यांना शक्‍य नसते. त्यामुळे रोज भाजी आणणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अशा महिला कडधान्यांना प्राधान्य देत आहेत. खानावळ व्यावसायिक त्यांच्याकडील अनेक ग्राहकांकडून महिन्याचे पैसे अगोदरच घेतात. मात्र, भाज्यांच्या भावातील वाढीमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, काही व्यावसायिक भाजीऐवजी कडधान्याचा वापर करू लागले आहेत. 

पेट्रोल, डिझेल वाढीचा फटका 
पूर्वी कांद्याच्या भावामुळे लोक त्रस्त झाले होते. आता टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे लोकांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. नागपूरमध्ये साऊथ आणि संगमनेरहून माल येत आहे. डिझेलचे भाव वाढल्याने, भाज्यांच्या भाव वाढले आहे. सद्या एक टोमॅटोची गाडी 3 ते साडेतीन लाखात पडत असल्याने, व्यापारीही टोमॅटोची खरेदी करण्यास हात आखडते घेत आहेत. टोमॅटोप्रमाणेच फुलकोबी 60, पत्ताकोबी 40, कारले 60, शिमला 60, टोंडली 60, भेंडी 40, पालक 40, चवळी शेंगा 40, गवार 60 रूपये प्रतिकीलो विकले जात आहेत.

हेही वाचा - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

भाजी विकणे परवडत नाही
पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने, भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. टॉमेटोची आवक साऊथ आणि संगमनेरहून होत असून, सध्या गाड्याही कमी येत आहेत. आवक कमी आणि भाव वाढ त्यामुळे आम्हालाही किरकोळात भाजी विकणे परवडत नाही. 
राजेंन्द्र साबळे,
भाजीविक्रेता, नरेंद्रनगर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy rupees per kg of tomatoes