"ती'म्हणतेय, "मी' नजरेतून उतरली तर नाही ना ! मित्रा, बोहणीही झाली कठीण..

file
file

पारशिवनी (जि.नागपूर): कोरोना व्हायरस येण्यापूर्वी दृष्ट लागावी इतकी मी सुंदर होती. कोणीही माझ्या गोंडस रूपाकडे पाहून "लालपरी, मैदान खडी, क्‍या खुब चली' असे कौतुकाने सिनेमाचे गीत मनोमनी गात प्रवास करायचे. दोन महिन्याच्या लॉकडाउननंतर कोरोनाची धास्ती आजही कायम असल्याने नागरिक लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरही भयभीत आहेत. का बरं, असे काय झाले, माझे "आशीक' आज माझयापासून दूर होतायेत. कदाचित मी तुमच्या नजरेतून उतरली तर नाही ना !

जाने कहा गये वो दिन...
लॉकडाउन शिथिल झाल्याने आणि प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची "लालपरी'ची सेवा सुरू केली. तरीही कुणीही बसण्यास तयार नाहीत. बसस्थानकावर सुनसान वातावरण आहे. एका दिवशी वीस तीस रुपयांची आवक एकटदुकट प्रवाशांकडून होत आहे, हे फार मनाला दुखावणारे चित्र आहे. एकेकाळी हजारो नागरिकांनी गजबजलेले बसस्थानक आज ओस पडले आहे. माझी सेवा सुरू होउनसुद्धा एकही प्रवासी माझ्यात प्रवास करण्यास आताही तयार नाही. कोरोना व्हायरसची दहशत आजही नागरिकांत कायम असल्याने रामटेक-सावनेर मार्गावर धावणारी मी "लालपरी' एकटीच धावत असल्याची मनात खंत आहे. आधी मला अर्थात "लालपरी'ला जागोजागी प्रवासी हात देऊन थांबवित असल्याचे चित्र पाहावयास मिळायचे. माझी प्रतीक्षा करावी लागायची. माझ्या वेळेआधी प्रवासी बसस्थानकावर उपस्थित राहायचे. पण आज मी म्हणजे "लालपरी' एकटी पडली की काय? चालक वाहकाशिवाय या "लालपरी'त एकही प्रवासी प्रवास करीत नसल्याने एक तर महामंडळाचा लाखो रुपयांचा तोटा होत आहे. दुसरीकडे प्रवाशांनी माझ्याकडे पाठ फिरवली असून गजबजणारे बसस्थानक प्रवाशाविना वाझोंटे पडले आहे.

कधी वीस रूपये तर कधी शंभर रूपये बोहणी
रामटेक-सावनेर या मार्गावर मागील आठवड्यात माझी सेवा सुरू झाली खरी, पण रामटेकवरून सुटणारी "मी' प्रवासी न मिळाल्याने रिकामी सावनेरला पोहोचली. एखादा प्रवासी मिळालाच तर 20-30 रुपयांची महामंडळाला बोहणी मिळाली तर नशीब. एकटदुकट प्रवासी या मार्गावरून माझ्यात प्रवास करीत असल्याने कधी 20रुपयांत तर कधी 100 रुपयांची आवक तेवढी होत आहे. एक वेळ याच तुम्हा प्रवाशांना "माझ्या'त गर्दीमुळे उभे राहून प्रवास करावा लागायचा. खचाखच गर्दीतही प्रवासी एसटीने प्रवास करायचे. पण आज एकही प्रवासी बसथानकावर दिसून येत नाही. महाराष्ट्राची "लाइफलाइन' समजल्या जाणारी मी अर्थात "लालपरी' आज एकटी झाली आहे. मी तुमच्यासाठी रस्त्यावर धावून आली आहे. तुम्ही मला एकटे तर सोडले नाही ना, असा मी तुम्हाला प्रश्‍न करतेय...प्रवाश्‍यांनो, ऐकताय ना ?

एखादा प्रवासी मिळालाच तर भाग्य
सावनेर-रामटेक मार्गावर दररोज चार फेऱ्या व्हायच्या. पण, आता प्रवासी मिळत नसल्याने एसटी रिकामी जात आहे. एखादा प्रवासी मिळालाच तर भाग्य. एसटी बसेसची सॅनिटायझरने सुरक्षा केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत आहे. तरीही कोरोनाची दहशत कायम असल्याने आजही बस रिकाम्या धावत आहेत.
गजानन चौधरी
बसस्थानक वाहतूक नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com