"ती' ऐकत होती हेडफोनवर गाणे, मृत्यू करीत होता "तिची' प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

रुही आणि कुणी आणखी हे कानात हेडफोन लावून संगीताचा आनंद घेत रेल्वे रूळावर चालत होते. रेल्वे धडधड करत हॉर्न वाजवत जवळ आली. परंतु त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. रुहीसोबत दुसरा कुणी असता तर तिचे प्राण वाचविले असते.​

टेकाडी (जि.नागपूर) : राष्ट्रीय महामार्ग पुलाखालच्या निर्जनस्थळी रेल्वेरूळ आहे. तिथून रामटेकवरून नागपूर इतवारीसाठी परत जाणाऱ्या रेल्वेगाडीला धडकून कांद्री शंकरनगर येथील पंधरावर्षीय युवती रुही सतीश बेलेकर हिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 15) दुपारी 3 वाजता उघडकीस आली. रात्री उशिरा तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्यानंतर आई संध्याने कन्हान पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून घेतली. 

क्‍लिक करा : आदित्य ठाकरे विचारणार पंतप्रधान मोदींनी हा प्रश्‍न

रेल्वेच्या धडकेत क्षणात खेळ खल्लास 
कन्हान पोलिसांना रामटेक इतवारी जाणारे रेल्वेचालक एन. के. दास यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मर्ग दाखल करत प्रकरण तपासात घेतले. रुहीसोबत आणखी कुणी होते काय, हा प्रश्न अद्याप निरुत्तर असल्याने रुहीच्या मृत्यूचा तिढा कायम आहे. रुही आणि कुणी आणखी हे कानात हेडफोन लावून संगीताचा आनंद घेत रेल्वे रूळावर चालत होते. रेल्वे धडधड करत हॉर्न वाजवत जवळ आली. परंतु त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. रुहीसोबत दुसरा कुणी असता तर तिचे प्राण वाचविले असते. परंतु रुही रेल्वेला धडकली. रुहीला रक्ताच्या थारोळ्यात ठेवून निर्दयी मित्राने घटनास्थळावरून पळ काढला असावा. माहितीच्या आधारे पोलिसांनी मर्ग दाखल करून गुरुवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र रुहीच्या मृत्यूवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. निर्जनस्थळी अपघातप्रसंगी तिच्यासोबत कुणी असताना माहिती देण्यास पुढे यायला भीती कसली, अशा अनेक प्रश्नांना पेव फुटले असून रुहीच्या मृत्यूचा तिढा कायम अद्याप कायम आहे. 

 क्‍लिक करा : घरी कोणीही नसताना तो आला, दहा मिनीटे अंगणात चर्चा केली अन्‌...

दुसरे कोण होते तिच्यासोबत? 
लहान भावाला दुपारी मैत्रिणीकडून पुस्तक आणायचे म्हणून सांगून 
गेलेली रुही रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. घरी लहान भाऊ, वडील नागपूर येथे कामाला असतात. आई कामावर असते. भाड्याच्या खोलीत राहून उदरनिर्वाह सुरू असताना असे अकल्पित घडणे आईवडिलांना धक्‍का देऊन गेले. घटनास्थळी रेल्वे ट्रॅकवर कानात हेडफोन लावून गाणे ऐकत असताना अपघात झाल्याची माहिती परिसरात पुढे करण्यात आली आहे. रुहीचा अपघात नसून घातपात असल्याचाही संशय काहींनी व्यक्‍त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "She was listening to a song on headphones, dying" waiting for her