श्रेयांश, मोहम्मद प्रथम; आयसीएसई दहावी, बारावीचा निकाल जाहीर 

मंगेश गोमासे
शुक्रवार, 10 जुलै 2020

"आयसीएसई'तर्फे 27 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्येच पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उर्वरित पेपरचे मूल्यांकन "अल्टरनेट असेसमेंट स्कीम'च्या माध्यमातून करण्यात आले.

नागपूर : द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशनतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. "आयसीएसई' दहावीच्या परीक्षेत काटोल रोडवरील चंदादेवी सराफ स्कूलचा श्रेयांश कटारिया आणि एमएसबी एज्युकेशनचा मोहम्मद मुस्तफा सुनेवाला या दोघांनी 99.2 टक्‍क्‍यांसह शहरातून संयुक्त प्रथम स्थान पटकावले आहे. 

"आयसीएसई'तर्फे 27 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्येच पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उर्वरित पेपरचे मूल्यांकन "अल्टरनेट असेसमेंट स्कीम'च्या माध्यमातून करण्यात आले. दहावीच्या परीक्षेत देशभरातून 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...
 

परीक्षेत 1 हजार 377 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. शहरातून चंदादेवी सराफ स्कूल, सेवंथ डे ऍडव्हाटीस्ट स्कुल, एमएसबी स्कुल, मारी पाउस्पीन स्कुल यासह एकूण सात शाळांमध्ये दुपारी 3 वाजता निकालाची घोषणा करण्यात आली. आयसीएसईचा निकाल 99.84 तर आयएससीचा (बारावी) निकाल 96.84 टक्के लागला. 

आयसीएसईमध्ये 1 लाख 12 हजार 668 विद्यार्थी तर 95 हजार 234 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. आयएससीमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. नागपुरातून जवळपास सर्वच शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. दुसऱ्या स्थानावर 99 टक्‍क्‍यासह चंदादेवी सराफ स्कुलचा प्रफुल्ल तभाने तर तिसऱ्या स्थानावर 98.8 टक्‍क्‍यांसह आदित्य जाजू याने यश मिळविले. 

दृष्टिक्षेपात आकडेवारी 

  • आयसीएसई (दहावी)- 2,07,0903 
  • आयएससी (बारावी)- 88,409 
  • उर्त्तीण विद्यार्थी (दहावी) - 2,06,525- (बारावी) 85,611 
  • मुलींची संख्या (दहावी)- 95,234 - मुलांची संख्या -1,12,668 
  • बारावी - मुलींची संख्या - 40,980 मुलांची संख्या - 47,429 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreyansh, Mohammed first in ICSE X, XII