esakal | नागपूरचे महत्व होणार कमी? 'बार्टी'चे कार्यक्षेत्र कमी होण्याची चिन्हे  
sakal

बोलून बातमी शोधा

Signs of reducing workspace of BARTI in nagpur

बार्टी ही साामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. आपल्या नावाप्रमाणेच या संस्थेचे मुख्य कार्य संशोधन व प्रशिक्षणाचे आहे. यासोबतच बार्टीच्या कार्याची मोठी व्याप्ती आहे.

नागपूरचे महत्व होणार कमी? 'बार्टी'चे कार्यक्षेत्र कमी होण्याची चिन्हे  

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या (बार्टी) धर्तीवर सारथी व महाज्योतीची स्थापना करण्यात आली. परंतु आता बार्टीचेच अस्तित्वही धोक्यात आले आहे. निधीचे कारण पुढे करीत ८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. बार्टीचे महत्त्वसोबत कार्यक्षत्रही कमी होणार असल्याचा चर्चा आहे.

सविस्तर वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

बार्टी ही साामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. आपल्या नावाप्रमाणेच या संस्थेचे मुख्य कार्य संशोधन व प्रशिक्षणाचे आहे. यासोबतच बार्टीच्या कार्याची मोठी व्याप्ती आहे. अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत स्पर्धा परीक्षेसाठी मदत करण्यात येते. यामुळे यूपीएससी व एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षामध्ये अग्रेसर असतात. बार्टीचे हे कार्य लक्षात घेऊनच मराठा समाज व ओबीसी समााजातर्फे स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची मागणी केली जात होती. त्याच प्रमाणे जात प्रमाणपत्रासाठीही बार्टीची मदत घेण्यात येते.

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने अर्थसंकल्पात कपात केली. सर्वच विभागांचा याचा फटका बसला. परंतु सामाजिक न्याय विभागाने मात्र निधी नसल्याच्या नावाखाली कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लाावला आहे. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीमध्ये सुद्धा कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ८० कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. एकीकडे रोजगाराची भाषा करण्यात येत असताना दुसरीकडे रोजगार हिरावण्याचे काम सरकारकडून होत असल्याचे दिसते.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

नागपूरचे महत्व होणार कमी

नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. दीक्षाभूमीला लागूनच साामाजिक न्याय भवनाची इमारत आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करताना याचे मुख्यालय नागपूरलाच ठेवण्यात आले. परंतु सत्ता बदलताच नागपूरचे महत्त्वही संपुष्टात आले. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीतही कर्मचारी कपात केली जात आहे. बार्टीचे नाागपुरात प्रादेशिक कार्यालय आहे. कर्मचारी कपातीनंतर याा प्रादेशिक कार्यालयाचे महत्त्वच नाममात्र होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 संपादन - अथर्व महांकाळ