कोविड रुग्णालयात भरती असलेला रुग्ण बाथरूममध्ये गेला अन्‌ कोसळला, मग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

शुक्रवारी मृत पावलेला व्यक्‍ती मूळचा अकोल्याचा असल्याचे समजते. गुरुवारी दुपारी त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळी हा रुग्ण बाथरूममध्ये गेला होता. परतत असताना खाली पडला. परंतु, कोरोनाबाधित असल्याने कोणीही मदतीला धावले नाही. नंतर त्याचा मृत्यू झाला. 

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत वाढत असतानाच मृत्यूसत्र सुरूच आहे. सोमवारी नागपूर शहरात हंसापुरी येथील 42 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. या मृत्यूमुळे मृतांचा आकडा पंधरावर गेला होता. यानंतर शहराला तीन दिवसांची उसंत मिळाली. यामुळे प्रशासनाला मोकळा श्‍वास घेतला आला. परंतु, शुक्रवारी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आता मृतांचा आकडा सोळावर गेला आहे. सतत होणाऱ्या मृत्यूमुळे प्रशासनही हादरले आहेत. 

शुक्रवारी मृत पावलेला व्यक्‍ती मूळचा अकोल्याचा असल्याचे समजते. गुरुवारी दुपारी त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळी हा रुग्ण बाथरूममध्ये गेला होता. परतत असताना खाली पडला. परंतु, कोरोनाबाधित असल्याने कोणीही मदतीला धावले नाही. नंतर त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा - मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...

मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमधील चार जून रोजी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. यानंतर रविवार सात जून रोजी "सारी' आजारासह कोरोनाच्या बाधेने 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. लगेच सोमवार 8 जून रोजी आणखी एका 42 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये झाला. एक जून रोजी या व्यक्तीला मेयोत दाखल करण्यात आले. 2 जून रोजी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. हंसापुरी येथील शेख बारी चौकातील रहिवासी असून त्याला हिमोडायलिसिस सुरू होते. 

किडनी निकामी झाल्यामुळे त्याचे जगणे डायलिसिसवरच होते. कोरोनाची बाधा झाल्याने श्‍वास घेण्यास त्रास होत होता. याशिवाय रक्तदाबही असल्याची नोंद केसपेपरवर आहे. प्रकृती गंभीर होताच त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर तीन दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा - दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला डॅडी, मात्र शहरात पोहोचताच...

शहरात एाप्रिल महिन्यात झालेले मृत्यू

 • 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 

शहरात मे महिन्यात झालेले मृत्यू

 • 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
 • 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
 • 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
 • 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 18 मे रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 25 मे रोजी मोमिनपुरा येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 27 मे रोजी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 39 मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू 
 • 31 मे रोजी हिंगणा रोडवरील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 

क्लिक करा - धोका वाढला, एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह; एक वर्षीय चिमुकलाही सुटला नाही...

शहरात जून महिन्यात झालेले मृत्यू

 • 4 जून रोजी अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 4 जून रोजी मध्य प्रदेशातील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 7 जून रोजी अमरावती येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 8 जून रोजी हंसापुरी येथील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 12 जून रोजी अकोला येथील 56 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteenth Corona patient dies in Nagpur city