esakal | सावधान! तुमची कार घराबाहेर असल्यास लक्ष द्या; गावगुंड करताहेत कारची तोडफोड आणि जाळपोळ 
sakal

बोलून बातमी शोधा

some bad people damaging cars parked out of house in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक आज गुरूवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर, शिल्पा सोसायटी मनिषनगरात आले.

सावधान! तुमची कार घराबाहेर असल्यास लक्ष द्या; गावगुंड करताहेत कारची तोडफोड आणि जाळपोळ 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः नरेंद्रनगर, मनिषनगरात समाजकंटकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. एक कार पेटवून दिली आणि १० ते १२ वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक आज गुरूवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर, शिल्पा सोसायटी मनिषनगरात आले. त्यांनी समिर राऊत यांच्या घरासमोर फोर्ड फिगो कार उभी होती. आरोपी युवकांनी कारमधील पेट्रोल काढले आणि कारवर शिंपडले. त्यानंतर कार पेटवून दिली. त्यानंतर या परिसरातील काही कार आणि दुचाक्यांची तोडफोड सुरू केली. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

जवळपास एक किमी परीतरातील वाहनांची तोडफोड आरोपींनी करीत दहशत निर्माण केली. पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. कंट्रोल रूमने बेलतरोडी पोलिसांना अलर्ट केले. बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी पंचनामा करीत वाहनांची झालेल्या तोडफोडीच्या नुकसानीचा अंदाज घेतला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

बेलतरोडी पोलिसांनी वाहनाची तोडफोड झालेल्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. घटना रात्रीची असल्यामुळे फुटेजमध्ये युवकांचे चेहरे व्यवस्थीत दिसत नाहीत. वर्णनाच्या आधारावर बेलतरोडी पोलिसांनी ४ ते ५ युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी तोडफोड केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा - कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम

अजनीच्या हद्दीतही तोडफोड

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंच्याशी प्लॉट परीसरात ४ कारची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तेच आरोपी या परीसरात आले. त्यांनीच या कारची तोडफोड केली. ही तोडफोड दारूच्या नशेत करण्यात आली असून केवळ मौजमस्ती करण्यासाठी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ