कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम 

टीम ई सकाळ 
Friday, 30 October 2020

दिवसभर कोमट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे तुम्हाला महिती आहे का? दिवसभरात किती कोमट पाणी प्यावं? आता चिंता करू नका या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.  

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण अंजीवन विस्खळीत झालं आहे. सर्वसामान्यांचे कोरोनामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्यात अनेकनाकडून कोरोनापासून बचाव करण्यासाठी निरनिराळे उपाय सुचवण्यात येत आहेत. यातलाच एक उपाय म्हणजे दिवसभर गरम किंवा कोमट पाणी पिणे. अनेक लोकं आपल्या लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना गरम पाणी देत आहेत. मात्र दिवसभर कोमट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे तुम्हाला महिती आहे का? दिवसभरात किती कोमट पाणी प्यावं? आता चिंता करू नका या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.  

कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत. नंतर कोणत्या व्यक्तीला हे कोमट पाणी पीता येणार नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी तत्त्व हे बाहेर टाकले जातात. त्यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहते. आणि यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहते.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

कोमट पाणी पिल्याने तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणून कोमट पाणी प्यायला तुम्हाला सांगितलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये साडे तीन हजार प्रकारचे वायरस आहेत. त्याच्या विरुद्ध जर कोमट पाण्यामध्ये जर लिंबू पिळून जर तुम्ही पिले तर या मधील जवळजवळ 80 टक्के वायरस विरुद्ध लढण्याची शक्ती तुमच्या शरीरात निर्माण होते.

पोटाचे अनेक आजार हे कोमट पाणी पिल्याने निघून जातात. तुमची पचन शक्ती चांगली होते. आणि ज्यांचे पचन चांगले असते त्यांचं आरोग्य उत्तम राहत. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी पिल्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे मेंदू मधील 80 टक्के पेशी ह्या ऍक्टिव्ह राहतात. त्यामुळे तुमची शरीरातील कोओरडीनेशन चांगलं राहत. आणि त्यामुळे तुमच आरोग्य चांगले होण्यास मदत होते.

जरी शरीराला फायदे असले तरी सर्वानाच कोमट पाणी पिता येत का? तर अश्या काही व्यक्ती आहेत किव्हा असे काही आजार आहेत ज्यामध्ये कोमट पाणी पिऊ नये..तर त्या कोणत्या व्यक्ती आहेत ते आपण पाहुयात..तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना बायपास झालेला असतो म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. अश्या व्यक्तींनी खूप कमी प्रमाणामध्ये कोमट पाणी प्यायचं आहे. तर दिवसातून फक्त 1 ते 2 वेळा कोमट पाणी पिता येत.

सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचे केस गळतात अश्या व्यक्तींनी सुद्धा खूप ज्यास्त कोमट पाणी पिल्याने आणि जास्त प्रमाणामध्ये केस गळतात. अश्या व्यक्तींनी पाणी जास्त पिले पाहिजे पण साधे पाणी पिले पाहिजे.आणखी एक गोष्ट म्हणजे उन्हातून आल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर लगेच कोमट पाणी पिऊ नये. त्यामध्ये कमीत कमी 30 मिनिटांचे अंतर असले पाहिजे. आता हे झाले कोणी कोमट पाणी पिऊ नये.

आता पाहू असे कोण व्यक्ती आहेत ज्यांनी अवश्य कोमट पाणी पिले पाहिजे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला सतत सर्दी व खोकला लागतो, धाप लागते, सतत आजारी पडतात अश्या लोकांनी कोमट पाणी हे आवर्जून पिले पाहिजे. त्याच बरोबर ज्यांना सतत फंगल इन्फेकॅशन होत, त्वचा रोग होतो अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिणे गरजेचं आहे.

चेहऱ्याचे ज्याचे जास्त प्रॉब्लेम येतात अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिले पाहिजे. ज्यांना लघवीमध्ये सतत जळजळ होते अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिणे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही,अपचनाची समस्या आहे,गॅस ची समस्या आहे अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिणे खुप महत्वाचं आहे.

नक्की वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

कोमट पाणी कोणत्या वेळेला प्यावे आणि किती प्रमाणामध्ये प्यावं..हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी नेहमी पिले तरी चालते, परंतु सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी हे आणि पिणे खूप लाभदायक असत. साधारणपणे एक वेळेस 250 ml पाणी प्यावे. कोमट पाणी पिण्याची कोणतेही तोटे नाहीत, परंतु ज्यांना उष्णतेचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी थोडं कमी पाणी प्यावे…आणि ज्यांची ह्रदय विकाराची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी थोडं कमी कोमट पाणी प्यावे… 

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advantages and disadvantages of drinking warm water daily