कोरोना संसर्ग : लवकरच "हा' तालुका करणार रूग्णांची "सेंचूरी' पार, झोपडपट्ट्यांमध्ये शिरकाव...

file
file

हिंगणा (जि.नागपूर) : हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 च्या घरात पोहोचली आहे. येत्या दोन दिवसात तालुका "सेंचुरी' पार करणार असल्याची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. परिणामी एमआयडीसीत आठवडाभर जिल्हा प्रशासनाने लॉकडावून घोषित करावे, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकारी महोदयांकडे केली. झोपडपट्ट्यंमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी वाचा : आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार

हिंगणा एमआयडीसीतील उद्योग 23 मार्चपासून बंद झाले होते. यानंतर दरम्यान जिल्हा प्रशासनाने उद्योग सुरू करण्याच्या परवानगी दिली. कोवीड संदर्भातील शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याचे उद्योगांना सांगण्यात आले. मात्र उद्योगांमध्ये कामगारांची शंभर टक्के उपस्थिती दिसून येत आहे. सोशल डिस्टंसिंगचेही पालन होत नसल्याचा प्रत्यय येत आहे. कंपन्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ केवळ प्रशासनाला दाखवण्यासाठी सॅनीटायझर फवारणी करण्याचा देखावा निर्माण केला आहे. यामुळे काही कंपन्यातील कामगारांना कोरोना झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : नागपुरात कोरोना सुसाट

तहसील प्रशासन सुस्त
ईसासनी, भीमनगर व निलडोहमधील अमरनगर येथील कामगारांचा यात समावेश आहे. यामुळे
कंपन्यांमधील कामगारांमध्येही कोराना वाढत आहे. उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांचे एक पथक कंपनी तपासण्यासाठी तैनात केले आहे. या पथकाने केवळ एका कंपनीवर कारवाई केली. यानंतर मात्र या पथकाचे काम सुरू आहे की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. पथकाचे प्रमुख तहसीलदार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही तहसिल प्रशासन सुस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिस प्रशासनही सुस्त झाल्याचा अनुभव येत आहे. यामुळे ए्‌यडीसी परिसर लवकरच "सेंचुरी' पार करण्याच्या टप्प्यावर आहे. यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाने किमान एक आठवडयाचे एमआयडीसी परिसरात लॉकडाऊन घोषित करावे,अशी मागणी आमदार मेघे यांनी केली आहे.

हेही वाचा : पारशिवनीत नळातून येते पिवळे पाणी, कोण खेळत आहे नागरिकांच्या जिवाशी

काही अधिकाऱ्यांची अनास्था
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार हिंगणा तालुक्‍यात कोवीड नियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्ग काळात तालुका आरोग्य विभागातील अधिकारी व जलसंधारण विभागातील अधिकारी, हिंगणा येथील ठाणेदार तळमळीने काम करीत आहेत. मात्र समितीतील महसूल व पंचायत समिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतमधील वरिष्ठ अधिकारी कोरोना संदर्भात जागृत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन होत नसतानाही शांत बसले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उपविभागीय अधिकारी या संदर्भात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com