परीक्षार्थींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाचा पुढाकार,  दोन दिवस धावणार या विशेष गाड्या

योगेश बरवड
Friday, 4 September 2020

एसटी महामंडळानेसुद्धा यापूर्वीच उमेदवारांच्या सोईसाठी विशेष अतिरिक्त गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ रेल्वेनेही विशेष ट्रेन सोडण्याची घोषणा केल्याने परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर- नागपूर ट्रेन शनिवारी सकाळी ८.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे नागपूरला पोहोचेल.

नागपूर :  नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमीची परीक्षा रविवारी नागपूर येथील मुख्य केंद्रांवर होणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे यादृष्टीने मध्य रेल्वेकडून शनिवार व रविवारी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे. नागपुरात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या एकूण १० रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एसटी महामंडळानेसुद्धा यापूर्वीच उमेदवारांच्या सोईसाठी विशेष अतिरिक्त गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ रेल्वेनेही विशेष ट्रेन सोडण्याची घोषणा केल्याने परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर- नागपूर ट्रेन शनिवारी सकाळी ८.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. पुणे -नागपूर ट्रेन शनिवारी दुपारी ४.१५ वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी साकळी ६.१५ नागपूरला पोहोचेल. 

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
 

हीच गाडी रविवारी रात्री ८.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. दोन्ही गाड्यांना या १८ स्लिपर व ६ जनरल डबे राहतील. मुंबई - नागपूर ट्रेन शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता नागपूरला पोहोचेल. हिच गाडी रविवारी रात्री ९ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १६ स्लिपर, ३ वातानुकूलित व २ जनरल डबे राहतील. नाशिक रोड- नागपूर ट्रेन शनिवारी दुपारी ४.१० वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री ९.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई गाठेल. 

या गाडीला १६ स्लिपर व ६ जनरल डबे राहतील. अहमदनगर- नागपूर स्पेशल ट्रेन शनिवारी दुपारी ४ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता नागपूरला पोहोचेल आणि रविवारी रात्री १० वाजता परतीच्या प्रवासाला निघून दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता अहमदनगरला पोहोचेल. या गाडीला १८ स्लिपर व ४ जनरल डबे राहतील. पनवेल- नागपूर स्पेशल ट्रेन शनिवारी दुपारी १.५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. हिच गाडी रविवारी रात्री १०.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १३ स्लिपर, ३ वातानुकूलित व ५ जनरल डबे राहतील.

हेही वाचा - या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?
 

नागपूर -अमरावती दरम्यान ८ डब्यांची मेमू स्पेशल चालविली जाईल. ही गाडी शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजता अमरावतीहून रवाना होईल व पहाटे ५.२५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि रविवारी रात्री ११ वाजता नागपूरहून परतीच्या प्रवासाला निघेल व पहाटे ४ वाजता अमरावतीला पोहोचेल. ८ डब्यांचीच जळगाव - नागपूर मेमू शनिवारी रात्री ९.३० वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी रविवारी रात्री १०.४५ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल व पहाटे ५.४० वाजता जळगाव स्टेशन गाठेल. 

अकोला -नागपूर मेमू शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता रवाना होईल व पहाटे ५ वाजता नागपूर स्टेशन गाठेल. हिच गाडी रविवारी रात्री ८ वाजता परतीच्या प्रवासाला निघून रात्रा ११.५५ वाजता अकोल्याला पोहोचेल. बल्लारशा -नागपूर मेमू शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता रवाना होईल व पहाटे ४.४५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि रविवारी रात्री ११.१५ वाजता परतीच्या प्रवासाला निघून पहाटे ४ वाजता बल्लारशाला पोहोचेल. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special trains for future military officers