प्रवासी वाहतुकीसोबत एसटीला आता नवीन जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनस्तरावरून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. अनेक योजना जाहीर होत आहेत. कारखानदार, शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाची वाहतूक होत नसल्याने विपरीत परिणाम होत आहे. उत्पादन पुरवठ्याची शृंखला कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ट्रकमधून शेतकऱ्यांच्या शेतमाला पासून ते व्यापारी, दुकानदार, लहान मोठे कारखानदार या सर्वांकडे असलेल्या मालाची वाहतूक ट्रकद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात करण्याची तयारी दर्शविली आहे.

नागपूर : लॉकडाउनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. वाहतूक क्षेत्राचीही चांगलीच वाताहत झाली आहे. शेतकरी, कारखानदारांनी उत्पादन सुरू केले असले, तरी वाहतुकीची फारशी साधने उपलब्ध नाहीत. या परिस्थितीवरून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीच्या क्षेत्रातही उडी घेतली आहे. नागपूर विभागही मालवाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनस्तरावरून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. अनेक योजना जाहीर होत आहेत. कारखानदार, शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाची वाहतूक होत नसल्याने विपरीत परिणाम होत आहे. उत्पादन पुरवठ्याची शृंखला कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ट्रकमधून शेतकऱ्यांच्या शेतमाला पासून ते व्यापारी, दुकानदार, लहान मोठे कारखानदार या सर्वांकडे असलेल्या मालाची वाहतूक ट्रकद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात करण्याची तयारी दर्शविली आहे.

सुरक्षितता, वक्तशीर आणि किफायतशीर असा एसटीचा लौकिक आहे. याच प्रतिमेचा उपयोग मालवाहतूक क्षेत्रातही मिळेल, असा एसटी महामंडळाचा विश्‍वास आहे. महामंडळाच्या नागपूर विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतमालापासून ते कारखानदारांकडून उत्पादित केलेला माल ट्रकमधून नियोजित स्थानापर्यंत सुरक्षित नेण्याचे नियोजन केले आहे.

अवश्य वाचा- अहो आश्‍चर्य! पळसाच्या झाडातून निघतेय सॅनिटायझर!!

नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल तसेच कारखानदारांकडे उत्पादित झालेला माल महामंडळाच्या मालवाहू ट्रकमधून सुरक्षित वाहतूक करण्यासाठी 3 ट्रक उपलब्ध आहेत. 28 रुपये प्रति किलोमीटर अधिक 18 टक्के जीएसटी या दराने इच्छुकांना मालवाहतूक करता येईल. या सेवेसंदर्भात अधिक माहितीसाठी विलास पाध्ये (9405235264), अभय बोबडे (9822681873) तसेच व्हिक्‍टर सायमन (9423630324) यांच्याशी संपर्क साधता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus ready to help farmers, manufacturers