"राज्य सरकारनं शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करावी": माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

अथर्व महांकाळ 
Saturday, 21 November 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक जवळ येत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस २ दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी शाळा सुरू करण्याबाबत फडणवीसांनी आपलं मत मांडलं आहे.

नागपूर: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. वीजबिलासंदर्भात आणि शाळा सुरु कारण्यासंदर्भात कधीकाळी एकमेकांचे पक्के मित्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. त्यात राज्यातील शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा  निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

क्लिक करा - हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार; भाजपच्या दिग्गज नेत्याने केला आरोप

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक जवळ येत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस २ दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी शाळा सुरू करण्याबाबत फडणवीसांनी आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाले फडणवीस

राज्यातील शाळा सुरु करताना राज्य सरकारने सर्व गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घेण्याची गरज आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरु करणं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे शाळा सुरु करताना सरकारने आणि शाळा प्रशासनाने कोरोनाच्या सर्व निकषांचं पालन होतंय का याचा विचार करणं महत्वाचं आहे. 

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

शिक्षकांच्या चाचण्या सरकारने मोफत कराव्या 

शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्याबाबत फडणवीसांनी आपले मत व्यक्त केले. शाळा सुरु करण्याआधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेणं महत्वाचं आहेच. खासगी लॅबमध्ये चाचणी न करता ITPCR चाचणी करणंही   आवश्यक आहे, मात्र या चाचण्यांचा संपूर्ण खर्च राज्य सरकारनं उचलणं महत्वाचं आहे. शिक्षकांसाठी कोरोना चाचणी मोफत करण्यासाठी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.           


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government have to do covid test of teachers for free