एसटीच्या अस्तित्वासाठी राज्यव्यापी अभियान

योगेश बरवड
Saturday, 19 September 2020

देशातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळते. पण, महाराष्ट्रात अत्यंत कमी वेतन मिळत आहे. 

नागपूर : कोरोनाच्या संकटात एसटी महामंडळाची आर्थिक वाताहत झाली आहे. कामगारांचे वेतनही दोन महिन्यांपासून खोळंबले आहे. या बिकट परिस्थितीत एसटी बचाव-कामगार बचाव अभियानांची हाक देण्यात आली आहे. त्याअंतर्गत अर्थसाहाय्य देण्यासह २७ कलमी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील आमदार, खासदारांना निवेदन दिले जाणार आहे. 

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

लॉकडाउनच्या १५३ दिवसांच्या काळात एसटी महामंडळाचे ३ हजार ३६६ कोटींचे नुकसान झाले आहे. संचित तोट्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे राज्य सरकारचाच उपक्रम असणाऱ्या एसटी महामंडळाला अर्थसाहाय्य देऊन लालपरीचे आर्थिक संकटात सापडलेले चाक बाहेर काढण्यासाठी या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)ने केली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

गुजरात, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, हिमाचल, पंजाब, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, गोवा, उत्तराखंड या राज्यांतील सरकारने प्रवासी कर कमी ठेवण्याबरोबर तेथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बस खरेदी, बस स्थानक बांधकाम, संगणकीकरण, नवीन यंत्र सामग्री खरेदी, कर्जाचे भांडवलात रूपांतर करणे अशा विविध बाबींकरिता आर्थिक साहाय्य करण्यात आले. महाराष्ट्रात मात्र आर्थिक सहाय्य करत नाही. देशातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळते. पण, महाराष्ट्रात अत्यंत कमी वेतन मिळत आहे. 

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

एसटी कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा. जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन तात्काळ द्यावे.लॉकडाउनच्या काळातील नुकसान भरपाईपोटी ३ हजार कोटींचे अनुदान द्यावे. एस.टी. कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घरभाडे भत्ता देण्यात यावा. लॉकडाउन काळात एसटी कर्मचाऱ्यांना हजेरी देण्यात यावी. यासह एकूण २७ मागण्या कामगारांनी केल्या आहेत. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

सर्वसामान्य जनतेला किफायतशीर सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला शासनाने आर्थिक साहाय्य द्यावे. तुटपुंज्या वेतनात संसाराचा गाडा रेटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी वेतनवाढही द्यावी. 
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
 

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: statewide campaign for the existence of MSRTC