
आयआयटीला नंबर न लागल्याने त्याला अतीव दुःख झाले होते. तो सध्या रामदेवबाबा महाविद्यालयात इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. शिक्षणात रमत असतानाच त्याला आयआयटीत नंबर न लागल्याची खंत सतावत होती. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नागपूर : आयआयटीला नंबर न लागल्याने नैराश्यात गेलेल्या हुशार विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी मानकापुरात उघडकीस आली. आयुष अजयकुमार यादव (१९, रा. बाबा फरीदनगर) असे आत्महत्या केलेल्या युवा अभियंत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार यादव हे रेल्वे विभागात अधिकारी आहेत, तर पत्नी पूनम या रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना आयुष एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. दहावी आणि बारावीत तो मेरीट आला होता. त्याने नुकताच आयआयटीची परीक्षा दिली होता.
हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?
मात्र, त्याचा एका गुणाने आयआयटीला नंबर लागला नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. आयआयटीला नंबर न लागल्याने त्याला अतीव दुःख झाले होते. तो सध्या रामदेवबाबा महाविद्यालयात इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. शिक्षणात रमत असतानाच त्याला आयआयटीत नंबर न लागल्याची खंत सतावत होती. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मुलाने चाकूने वार करून वडिलाची हत्या केली. ही थरारक घटना एमआयडीसीतील अमरनगरमधील पालकर ले-आऊट येथे बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सम्राट रंगारी (वय ५८) असे मृताचे तर सिकंदर रंगारी (वय २७) असे मारेकरी मुलाचे नाव आहे. सम्राट हे एमआयडीसीतील कंपनीत काम करीत होते. दोघेही घरी एकटेच होते.
क्लिक करा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
बुधवारी रात्री सिकंदर याने सम्राट यांच्यासोबत वाद घातला. संतप्त सिकंदर याने चाकूने वार करून सम्राट यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कोतवाली आणि एमआयडीसी ठाण्यांतर्गत घडलेल्या रस्ते अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. न्यू नंदनवन निवासी चंद्रशेखर कंठीराम सोनकुसरे (४६) हे सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सायकलने घरी जात होते. भोला गणेश चौक ते जगनाडे चौकादरम्यान अज्ञात दुचाकी वाहनाच्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यात चंद्रशेखर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी चंद्रशेखर यांचा मृत्यू झाला.
कोतवाली पोलिसांनी आरोपी वाहन चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दुसरी घटना एमआयडीसी ठाण्यांतर्गत घडली. मृतक विठ्ठलनगर, हुडकेश्वर रोड निवासी राजेश त्र्यंबक वितोंडे (४५) आहेत ५ नोव्हेंबरला राजेश आपल्या दुचाकी वाहनाने एमआयडीसी मार्गाने जात होते. रुख्मीणी मेटल कंपनीसमोर कार चालकाने त्यांना जोरदार धडक दिली.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारार्थ लकडगंज परिसरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केले. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कार चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे