
८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालानंतर खऱ्या अर्थ्यांने विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत भरीव वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पाचव्या सेमिस्टरच्या निकाल आणि अंतिम सेमिस्टरचा निकाल यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एमए अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या निकालात चारशेपैकी ४०० पैकी गुण मिळाविण्याचा प्रताप विद्यार्थ्यांनी दाखविला आहे. विशेष म्हणजे या निकालाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून खुद्द प्राध्यापकही बुचकाळ्यात पडले आहेत. या प्रकाराला विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेतील कीर्तीमान असल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
एमए अभ्यासक्रमातील परीक्षांमध्ये दरवर्षी लेखी प्रश्न असल्याने, त्या प्रश्नांचे उत्तर लिहीताना विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येत असते. अनेकदा योग्य उत्तर लिहूनही त्यात पैकीच्या गुण तसे मिळत नाहीत. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षेचा मार्ग स्विकारला. त्यामुळे ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालानंतर खऱ्या अर्थ्यांने विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत भरीव वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पाचव्या सेमिस्टरच्या निकाल आणि अंतिम सेमिस्टरचा निकाल यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच एमए अभ्यासक्रमातही अशाच प्रकारची वाढ झाल्याचे दिसून आले. यामधील चारही विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण विद्यार्थ्यांना मिळाले. विशेष म्हणजे त्यामुळे या सेमिस्टरचा सीजीपीए १०-१० आहे. मात्र, मागील तीन सेमिस्टरपैकी पहिल्या सेमिस्टरमध्ये एसजीपीए ५.५७ -१०, दुसऱ्या सेमिस्टरच्या एसजीपीए गुण ५.७५-१० तर तिसऱ्या सेमिस्टरमधील एसजीपीए ६.५०-१० इतका आहे. त्यामुळे आताचा १०-१० सीजीपीए बघून विद्यार्थ्यांमध्ये आनंद तर शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे ही बाब विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमुळे निश्चितच इतिहासात नोंदविण्यासारखी असल्याचे दिसून येते.
हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय...
यामुळे मिळाले गुण -
विद्यार्थ्यांना यंदाच्या परीक्षेत ५० पैकी २५ प्रश्न सोडवायचे होते. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यापेक्षा जास्त व काहींनी संपूर्ण प्रश्न सोडविले. दुसरीकडे विभाग आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना २० पैकी २० आंतरिक गुण दिले. त्यातूनच विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाल्याचे दिसून येते.