'War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

टीम ई सकाळ
Monday, 30 November 2020

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळताच सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 'वॉर अँड पीस' असे लिहित ट्विट केले होते.

चंद्रपूर :  आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. त्यांनी ९ तासांपूर्वी हे कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट करत 'वॉर अँड पीस' असं लिहिलंय. त्यामुळे त्या या ट्विटमधून नेमके काय सांगू पाहत होत्या? अशी चर्चा रंगली आहे.

 

 

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी  काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा व्हिडिओ दोन तासांतच माध्यमावरून हटविण्यात आला होता. त्यानंतर शीतल आमटे करजगी यांनी व्हिडिओत केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे गेल्या २४ नोव्हेंबरला जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती.

हेही वाचा -बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास

शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले होते. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या 'आनंदवन'मधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळताच सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 'वॉर अँड पीस' असे लिहित ट्विट केले होते. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. 

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr sheetal amte karjgi last tweet before she committed to suicide