
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या "वावर हाय तर पावर हाय"फेम प्रवीणला लहानपणापासूनच कलेची आवड होती. तो सुरुवातील पोवाडे गायचा, मिमिक्री करायचा.
नागपूर : प्रतिभेला संधीची साथ लाभली आणि प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बुलडाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी (ता. नांदुरा) सारख्या छोट्याशा गावात जन्मलेला युवा कलावंत प्रवीण लाडने ते सिद्ध करून दाखविले. गेल्या तीन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात जम बसविणाऱ्या प्रवीणने एका रोमँटिक गाण्याद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावर धमाकेदार एंट्री करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीणला लहानपणापासूनच कलेची आवड होती. कॉलेज लाईफमध्ये पोवाडे व मिमिक्री करीत असताना विद्यापीठ स्तरावरील एका स्पर्धेत बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला आणि तेथून त्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. सुरुवातीला नाटक व एकांकिकांमध्ये काम करत त्याने थेट बॉलिवूड गाठले. २६ वर्षीय प्रविणने वेगवेगळ्या गाण्यांमधून, नाटकांमधून आणि लघुपटांतून आपले अष्टपैलूत्व सिद्ध करत मराठी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. त्याने आतापर्यंत डझनभर गाणे, चार ते पाच लघुपट, नाटक व एकांकिकांसह चित्रपटात छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. प्रवीण अलीकडेच एका गाण्याद्वारे पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे.
हेही वाचा - 'त्या' रात्री १० नाही ११ जीव गेलेत; भंडारा आग प्रकरणात मोठा ट्विस्ट;...
प्रवीणची भविष्यात चित्रपट क्षेत्रात करिअर करायची इच्छा असून, दर्जेदार नट म्हणून स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. संधी मिळाल्यास चित्रपट निर्मिती करण्याचे स्वप्नही त्याने बोलून दाखविले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले
'माझी लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा होती. सुदैवाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संधी मिळाली आणि जिद्दीने पुढे गेलो. भविष्यात मनोरंजन व चित्रपट क्षेत्रात करिअर करून गावाचे नाव मोठे करायचे आहे.'
-प्रवीण लाड, युवा कलावंत