esakal | सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सरकारच्या ‘त्या’ संशोधकाला पुरस्कारच दिला पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Mungantivar says The government is antiVidarbha

आदिवासी बांधवांना खावटी देण्याचे जाहीर केले होते. परंतु, अद्याप ती देण्यात आली नाही. यासाठी अनेक निकष लावण्यात आले. त्यामुळे आदिवासी सेलच्या माध्यमातून सरकारवर ४२०चा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येईल.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सरकारच्या ‘त्या’ संशोधकाला पुरस्कारच दिला पाहिजे

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : करारानुसार अधिवेशन नागपूरला होणे अपेक्षित होते. परंतु, ते मुंबईला घेण्यात येणार आहे. मार्च महिन्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याचेही जाहीर केले नाही. तसेच विदर्भ विकास मंडळाल मुदतवाढ दिली नाही. सरकार विदर्भ विरोधी असल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांना खावटी न दिल्याने प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात सरकार विरोधात ४२० गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात येणार असल्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपतर्फे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाचे कारण सांगून नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. नागपूरला कोरोनाचा धोका आहे, मुंबईत नाही, असे संशोधन करणाऱ्याला पुरस्कार दिला पाहिजे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

नाना पटोले अध्यक्ष असल्याने अधिवेशन होण्याचा विश्वास होता. परंतु, त्यांनी ना म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याचा जाब अधिवेशनात विचारू, असेही ते म्हणाले. विदर्भ विकास मंडळाची मुदत एप्रिल महिन्यात संपली. सहा महिन्यांचा वेळ झाल्यावरही अद्याप मुदतवाढ देण्यात आली नाही. याच्या माध्यमातून विदर्भाला हक्काचा निधी मिळतो. हा निधी न देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला.

आदिवासी बांधवांना खावटी देण्याचे जाहीर केले होते. परंतु, अद्याप ती देण्यात आली नाही. यासाठी अनेक निकष लावण्यात आले. त्यामुळे आदिवासी सेलच्या माध्यमातून सरकारवर ४२०चा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्‍यालायलात दाद मागू, असेही त्यांनी नमूद केले.

संपादन - नीलेश डाखोरे