esakal | दिवाळी संपताच वाढला साखरेचा गोडवा, दरात झाली घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

sugar rate decreases after diwali in nagpur

केंद्र सरकारने कारखान्यातील इथेनॉलचे दर वाढवून दिल्याने आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सध्या ११७ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करीत असून, यात सहकारी- ४०, खासगी-४२, अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या ३५ कारखान्यांचा समावेश आहे.

दिवाळी संपताच वाढला साखरेचा गोडवा, दरात झाली घसरण

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : दिवाळीच्या मुहूर्तावर साखरेची मागणी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेपेक्षा मागणी कमी असल्याने दिवाळीची खरेदी मंदावताच साखर प्रति किलो एक रुपयांनी कमी झाली आहे. एक क्विंटल साखरेसाठी घाऊक बाजारात ३४५०-३५२० रुपये मोजावे लागत आहेत. 

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत...

केंद्र सरकारने कारखान्यातील इथेनॉलचे दर वाढवून दिल्याने आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सध्या ११७ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करीत असून, यात सहकारी- ४०, खासगी-४२, अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या ३५ कारखान्यांचा समावेश आहे. देशात ३१० लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होते, तर देशांतर्गत साखरेची मागणी २५० लाख मेट्रिक टन आहे. सध्या देशांतर्गत ३५ टक्के साखरेचा घरगुती आणि ६५ टक्के औद्योगिक वापरासाठी उपयोग होत आहे. तुलनेत म्हणजे साठ लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर गोदामात पडून आहे. या पार्श्वभूमीवर, कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाले आहे. गतवर्षी अनेक साखर कारखान्यांनी किमान हमी भाव देण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्जे घेतली होती. मात्र, साखरेचे बाजारातील दर स्थिर असल्याने साखर विक्री होऊ शकली नाही. 

हेही वाचा - पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळेला पाठ, कोरोनाच्या भीतीने ४५ टक्केच पालकांचे संमतीपत्र

कोरोनामुळे लग्नसराई, सणासुदीला वाढणारी साखरेची मागणी कमीच आहे. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात ३५५० ते ३६२० रुपये क्विंटल असलेले साखर आता ३४५० ते ३५२० रुपयापर्यंत खाली आली आहे. 

हेही वाचा - विदर्भात पुन्हा थंडी जाणार पाऊस येणार, याच आठवड्यात दिला इशारा 

साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल किमान एक लाख कोटी रुपये आहे. विविध कर रूपाने किमान १२ हजार कोटी रुपये सरकारला महसूल मिळतो. जागतिक स्तरावर साखर निर्मितीमध्ये ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो. देशांतर्गत साखर उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. साखरेचे उत्पादन अधिक असल्याने दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून ५० हजार क्विंटल कापसाची...

दिवाळीच्या काळात साखरेच्या दरात किंचित वाढ झाली होती. मात्र, दिवाळीला अपेक्षित अशी मालाची विक्री झाली नाही. दिवाळीनंतर ग्राहकांची संख्या कमी झाल्याने प्रति क्विंटल साखरेचे भाव १०० रुपयांनी कमी झाले आहेत. 
- प्रभाकर देशमुख, व्यापारी