मोबाईलमधील फोटोवरून उद्‌भवला वाद, युवकाला सहन न झाल्याने "त्याने' असे का करावे?...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी येथील राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य मिथिलेश उर्फ मयूर उमरकर हे गॅस एजन्सी चालवितात. त्या एजन्सीच्या कार्यालयाचे बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान पिंपळदरा येथील अरविंद बनसोड या युवकाने मोबाईलवरून फोटो काढले. ऑफिसचे फोटो का काढले, यावरून उमरकर यांनी हटकले. त्यावरून दोघांचीही बाचाबाची झाली.

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील एक छोटेसे खेडे पिंपळधरा. येथील अरविंद जनार्दन बनसोड (वय32) या युवकाचा पंचायत समिती सदस्य मिथिलेश उर्फ मयूर उमरकर यांच्याशी फोटो काढल्यावरून वाद झाला. तो अपमान सहन न झाल्याने अरविंदने बुधवारी रागाच्या भरात विष प्राशन केले. उपचारादारम्यान गुरुवारी (ता.28) रात्री त्याचा मृत्यू झाला. मयूर उर्फ मिथिलेश उमरकर विरुद्ध जलालखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हे नक्‍कीच वाचाः तिच्या असहय वेदनाही झाल्या "लॉक'

फोटोवरून झाली बाचाबाची
नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी येथील राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य मिथिलेश उर्फ मयूर उमरकर हे गॅस एजन्सी चालवितात. त्या एजन्सीच्या कार्यालयाचे बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान पिंपळदरा येथील अरविंद बनसोड या युवकाने मोबाईलवरून फोटो काढले. ऑफिसचे फोटो का काढले, यावरून उमरकर यांनी हटकले. त्यावरून दोघांचीही बाचाबाची झाली. या झालेल्या वादामुळे अरविंद याने कीटकनाशक खरेदी करून तिथेच रस्त्याने कीटकनाशक प्राशन केले. ही गोष्ट मयूर उमरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या गाडीने त्याला जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचारादारम्यान अरविंद बनसोड याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

हेही वाचा : आजारी असाल तर रेल्वेप्रवास टाळा

पं.स.सदस्यावर गुन्हा दाखल
निधनाची बातमी परिसरात एकाच खळबळ निर्माण झाला होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पोलिस बंदोबस्तात त्याचा मुतदेह पिंपळदरा येथे आणला. अरविंद बनसोड याच्या आप्तस्वकीयांनी मयूर उमरकर विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव व जलालखेडयाचे ठाणेदार दीपक डेकाटे यांनी लोकांची समजूत घालायचा प्रयत्न केला. दुपारी उमरकर व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. नंतर सायंकाळी अरविंदच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : ऑनलाईन जुगार खेळणे पडले महागात,पडल्या बेडया

पोलिस विभागाची टाळाटाळ
बुधवारी अरविंद बनसोडसोबत त्याचा मानलेला भाऊ गजानन भाऊराव राऊत (रा. कोहळी, ता. कळमेश्वर) हा होता. त्यांनी व मृताचे वडील जनार्दन बनसोड यांनी घडलेल्या घटनेबाबत बुधावरलाच जलालखेडा पोलिसात तक्रार दिली. परंतु ती घेण्यास नकार देण्यात आला. नंतर गुरुवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. परंतु त्यांनीही कोणतीच कारवाई केली नाही. पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार मयूर उमरकर व इतर चौघांनी अरविंदला मारहाण केली. मारहाणीचा विपरीत परिणाम होऊन त्याने विष प्राशन केले. अरविंदच्या मागे कुटुंबात दोन भाऊ व वृद्ध वडील आहेत.

राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न
अरविंद बनसोड याचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. बुधवारी दुपारी मी गॅस एजन्सीमध्ये असतांना अरविंद हा संशयितरित्या एजन्सीचे मोबाईलद्वारे फोटो काढत होता. मी त्याला हटकले व त्याच्या मोबाईल घेऊन बघितले तर त्यात गॅस एजन्सी व परिसराचे फोटो होते. मी मोबाईल पोलीस स्टेशनला जमा करतो, असे म्हटले असता तो निघून गेला. काही वेळाने ऑफिससमोर विष घेऊन आला. मी व माझ्या मित्रांनी त्याला स्वतःच्या गाडीने लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार केले. तिथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करून त्याच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली. या सर्व घटनेचा माझे विरोधक राजकीय फायदा उठविण्याकरिता वापर करीत असून घटनेला राजकीय रंग दिला जात आहे.
मयूर उमरकर
पं.स.सदस्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by poisoning a youth