व्यावसायिकाने स्नानगृहात जाऊन कापली हाताची नस; नंतर खोलीत घेतला गळफास

Suicide of a spice trader in Nagpur
Suicide of a spice trader in Nagpur

नागपूर : लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद झाल्याने व्यावसायिकाने आत्महत्या केली. ही घटना वाठोड्यातील खंडवानी टाऊन येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. हितेश सुरेश छाबरीया (वय ३२) असे मृताचे नाव आहे.

हितेश याचा मसाल्याचा व्यवसाय आहे. तो हॉटेल व मेसला मसाले पुरवायचा. लॉकडाउनमुळे हॉटेल व मेस बंद झाले. त्यामुळे त्याचा व्यवसाय बुडाला. त्याला आर्थिक चणचण भासू लागली. तो तणावात राहायला लागला. पत्नी स्वाती व नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी हितेश स्नानगृहात गेला आणि ब्लेडने हाताची नस कापली. त्यानंतर तो पहिल्या माळ्यावरील खोलीत गेला. पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.

दरम्यान, स्वाती स्नानगृहात गेली. यावेळी तिला टाईल्सवर रक्त दिसले. हितेश तिथे नव्हता. हितेशला पाहण्यासाठी ती पहिल्या माळ्यावरील खोलीत गेली. यावेळी हितेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. स्वातीने हंबरडा फोडला. फास काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ए. एस. बकतवार सहकाऱ्यांसह मेयोत पोहोचले. हितेशच्या आत्महत्येप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हितेश याच्या मागे पत्नी, दोन अपत्ये व मोठा आप्तपरिवार आहे.

गाडी पार्क करण्यावरून खून

गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. ही घटना रविवारी रात्री यशोधरानगरमधील बिनाकी मंगळवारी परिसरात घडली. राजू रंभाळ (रा. जोशीवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी करण यादव व शुभम वंजारी (रा. गोस्वामी आखाडा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. रस्त्यावर गाडी लावून दोघेही बोलत उभे होते. दरम्यान, राजूने त्यांना रस्त्याच्या बाजूला व्हा आणि गाडी बाजूला पार्क करा, असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे त्या दोघांनी चाकूने राजूचा खून केला.

पोहण्याचा मोह जीवावर बेतला

मित्रांसोबत गोरेवाडा तलावावर गेलेल्या युवकाला पोहण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात पोहण्यासाठी उतरताच युवक बुडाला. मित्रांनी मदतीसाठी हाका करीत त्याला इतरांच्या मदतीने वाचविण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दल माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. अंधार पडल्याने त्याची शोधमोहीम थांबविण्यात आली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com