ताई, बाई, अक्‍का, उमेदवार विचार करा पक्‍का !

file photo
file photo

टेकाडी (जि.नागपूर) ः गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय वरचढीत कोण कुणाला मात देणार, याचे रणकंदन सुरू झाले आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करत सर्वच राजकीय पक्ष गावातील छोट्याखानी बैठकांच्या कामाला लागले आहेत. कुठे बंडखोरांना शांत तर कुठे आयारामांना धडा शिकवण्याची रणनीती सुरू झाली आहे. कुठे गेल्या निवडणुकीचा वचपा काढण्याचा आलेख आखण्याचे काम प्रगतिपथावर आहे. गोंडेगाव सर्कलमध्ये जातीचे राजकारण होत असल्याचा ठपका नेहमीच लागलेला आहे. परंतु, या निवडणुकीत तरी जातीय समीकरण बसणार नसून विकासाचा उमेदवार कोण, या समीकरणाकडे सर्वसामान्य मतदारांनी लक्ष ठेवून गेल्या निवडणुकीचे चित्र डोळ्यांसमोर ठेवले आहे. 

2011 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार 
गोंडेगाव सर्कलला भाजपने तिकीट नाकारल्याने शिवसेनेकडून तिकीट पटकावणारे योगेश वाडीभस्मे यांनी या आधी दोनदा साटक सर्कलमधून भाजपकडून निवडणूक जिंकून जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. आरक्षण बदलल्यानंतर 2011-12 च्या निवडणुकीत त्यांनी सर्वसाधारण आरक्षण असलेल्या टेकाडी सर्कलमधून पक्षाकडून नामांकन दाखल केले होते. 2007 ते 2011 या कालावधीत व्यंकट कारेमोरे यांनी टेकाडी सर्कलचे भाजपकडून जि. प. सदस्य म्हणून नेतृत्व केले होते. 2011 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे योगेश वाडीभस्मे यांना टेकाडी सर्कलला उमेदवारी देण्यात आल्याने व्यंकट कारेमोरे यांनी पक्षासोबत बंडखोरीची मशाल हाती घेत भाजपला दोन भागात विभागले होते. व्यंकट कारेमोरे यांनी अपक्ष नामांकन दाखल करून दिग्गजांसोबत राजकीय आखाड्यात दंड थोपटले होते. राजकीय सारिपाटाच्या खेळात बंडखोर आणि अपक्षांकडे सर्वच पक्षांच्या वरिष्ठांचे डोळे असते. कोणाचा कसा गेम करायचा आणि कुणाला नामांकन परत घेण्याचा वेळेला गायब करायचे, हा रात्रीस चालणारा खेळही 2011-12 च्या निवडणुकीत टेकाडी सर्कलमध्ये रंगला होता. त्याचे फलित भाजपच्या ताब्यात असलेले टेकाडी सर्कलचे मैदान कॉंग्रेसचे शिवकुमार यादव यांनी चुरशीच्या लढतीत मारून नेले होते. 2020 ला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत फक्त सर्कल बदलल्या गेले, चित्र मात्र तेच आहे. भाजपकडून योगेश वाडीभस्मे यांच्यावर डाव न लावता व्यंकट कारेमोरे यांच्यावर पक्षाने डाव लावलेला आहे. त्यामुळे वाडीभस्मे यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतला. परंतु, शिवसेनेचे इच्छुक उमेदवार कैलास खंडार यांनी बंडखोरीचा "दणका' पक्षाला देत अपक्ष नामांकन दाखल केलेले आहे. आता 30 तारखेला नामांकन परत घेण्यास अपक्ष आणि बंडखोरांना शांत करण्यास पक्षश्रेठींना यश येते की, 2011 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जातीय समीकरण मोडणार काय? 

गोंडेगाव-साटक सर्कलअंतर्गत जातीय समीकरणाकडे सर्वांचेच लक्ष असते. सर्कलला तेली समाजाच्या उमेदवारानेच आजवर सर्कलचे नेतृत्व केले आहे. निवडणुकीच्या संघर्षात कुणबी समुदाय यशस्वी खेळी आजवर खेळू शकला नसल्याची चर्चा आहे. सर्कलमध्ये साधारणतः 35 ते 40 टक्‍के कुणबी, 25 ते 30 टक्‍के तेली, अनुसूचित जातीचे 10 ते 15 टक्‍के तर इतर 05 ते 10 अशी टक्‍केवारी आहे. 

क्‍लिक करा- पदवी विकायला काढलेल्या बेरोजगाराची चित्तरकथा 

काय होईल, अनुत्तरितच! 
माजी नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी साटक सर्कलमधून अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा मानस बनविलेला आहे. आजी आणि माजी आमदारांवर आक्रमक तोफ डागणारे वाडीभस्मे विद्यमान आमदारांच्या विकासकामांना लक्षवेधी करत निवडणूक लढतील. माजी आमदारांच्या कार्याचे दाखले देत व्यंकट कारेमोरे प्रचाराच्या तोफा सोडतील की, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेत जनतेचे मन आणि मत जिंकण्याचे काम डोणेकर करतील की, विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती खंडार यांच्या स्वरूपात होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे शिक्षा 
नरखेड ः पंचायत समितीअंतर्गत सभापतिपदासाठी सन 1999 ला झालेल्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील सुनीता पथे यांनी खोटे इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र तयार करून शासनाची व जिल्हा परिषदेची दिशाभूल केल्यामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालयात तीन वर्षे कारावास व नऊ हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. 
याबाबत 16 सप्टेंबर 1999 ला तत्कालीन पं. स. सदस्य सुधा पावडे यांनी तक्रार केली होती. यामध्ये आरोपी सुनीता पथे या खुल्या प्रवर्गातील येत असूनही त्यांनी इतर मागासवर्गीयचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पं. स. सभापतिपद बळकावले होते. या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर 417, 468, 469 अन्वये गुन्हा दाखल होता. या प्रकरणी नरखेड दिवाणी व फौजदारी न्यायालयात खटला दाखल होताच प्रथम न्यायदंडाधिकारी एन. बी. राठोड यांनी पथे यांना तीन वर्षे सक्त कारावास व नऊ हजार रुपयांचा दंड थोटावला. शासनाच्या वतीने ऍड. विलास मिरचे व फुले यांनी कामकाज पाहिले, तर आरोपीच्या वतीने ऍड. एस. एम. नाफडे यांनी कामकाज पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com