esakal | कोणत्या कारणामुळे शिक्षकांनाच करावे लागले "शिक्षण बचाव आंदोलन'? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी.

कोरोनाच्या नावाखाली राज्याच्या शिक्षणक्षेत्रात गोंधळ वाढत चालला आहे. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसून, शिक्षण विभागात सरकार सपेशल अपयशी ठरले आहे, असा आरोप होत आहे.

कोणत्या कारणामुळे शिक्षकांनाच करावे लागले "शिक्षण बचाव आंदोलन'? वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. प्राध्यापकांना कामाचा जाब विचारण्यात येत आहे. विद्यापीठांच्या परीक्षांचा घोळ कायम आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली राज्याच्या शिक्षणक्षेत्रात गोंधळ वाढत चालला आहे. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसून, शिक्षण विभागात सरकार सपेशल अपयशी ठरले आहे, असा आरोप होत आहे.


हा गोंधळ थांबला पाहिजे, ठोस पावले उचलली पाहिजे यासाठी चक्क शिक्षकांनाच आंदोलन करावे लागले. ठोस निर्णय घेण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. यासाठी भाजप शिक्षक आघाडीने पुढाकार घेतला होता आणि त्यांनी "शिक्षण बचाव आंदोलन' केले. आपल्या मागण्या राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीने
शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके, विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

वाचा - 'लॉकडाऊन'च्या काळात पोट भरण्यासाठी नवा फंडा, दुचाकीवरून तो विकतोय चहा, समोसे

राज्याद्वारे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर या विषयाचे गुणांकन कसे होणार? याबाबत कुठलाही निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला नाही. यामुळे राज्यातील जवळपास 16 लाख पालक संभ्रमात आहेत. 10 वी 12 च्या निकालांच्या कामाचे नियोजन, तारखा अद्याप घोषित झाल्या नाहीत. यासोबतच पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे नियोजन अद्याप केले नसल्याने शाळा कधी सुरू होतील, कशा सुरू होतील, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी असेल, विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर देणार का? याबाबत पालकांना व शाळांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. शाळांमधील विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन करण्याबाबत अद्याप कार्य सुरू झालेले नाही, विद्यार्थी संख्येअभावी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येऊ नये, असा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आला नाही, याकडेही आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले. मागणीचे निवेदन उपसंचालक अनिल पारधी आणि शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना सादर करण्यात आले.