esakal | चोरट्याने फोडले भरचौकातील एटीएम; गॅस कटरचा केला वापर; तब्ब्ल इतकी रक्कम लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Thief steal money from ATM in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिर्वादनगरातील द्वारका कॉम्प्लेक्समध्ये एसबीआय बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आला नाही.

चोरट्याने फोडले भरचौकातील एटीएम; गॅस कटरचा केला वापर; तब्ब्ल इतकी रक्कम लंपास

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : चोरट्यांनी भरचौकातील एटीएम गॅस कटरने कापून कॅश काउंटरमधील १ लाख ६६ हजार रुपये लंपास केले. ही घटना रविवारी (ता.१३ ) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिर्वादनगरातील द्वारका कॉम्प्लेक्समध्ये एसबीआय बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आला नाही. रविवारी पहाटेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील एक युवक एटीएममध्ये घुसला. त्याने एटीएमचे कॅश काउंटरचे शटर गॅस कटरने तोडले.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

काउंटरमधील १ लाख ६६ हजार रुपये बॅगमध्ये भरले. युवकाने पळ काढला. सकाळच्या सुमारात कुणीतरी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आले असता ही बाब उघडकीस आली. श्रीधर केदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्हीत अडकला चोर

चोरी करताना चोरट्याचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. पोलिसांनी फुटेज जप्त केले असून त्यावरून चोरट्याचा शोध सुरू आहे. तसेच चोरटा ज्या रस्त्याने पळाला, त्या रस्त्यावरील फुटेजसुध्दा पोलिसांनी जप्त केले आहे.


जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

लूटमार, चोऱ्या वाढल्या

लॉकडाउननंतर चोऱ्या, घरफोड्या,वाटमाऱ्या, लूटमार अशा प्रकारचे गुन्हे वाढले आहेत. अनेक जण बेरोजगार झाले असून त्यांनी हाताला काम मिळत नसल्याने गुन्हेगारीकडे पाऊल टाकले आहे. अनेक तरुण दारू, गांजा, ड्रग्ससारख्या व्यसनाकडे वळले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ