esakal | तेरा वर्षांनंतर पुन्हा रिपब्लिकन आघाडीच्या प्रयोगाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Thirteen years later the Republican lead again

रिपाइंची वज्रमुठ बांधली जाते, त्यावेळी रिपाईची शक्ती दिसून येते इतिहास राहिला आहे. १९९७ च्या निवडणुकीवेळी रिपब्लिकन ऐक्य झाले त्यावेळी १६ नगरसेवक निवडून आले होते.

तेरा वर्षांनंतर पुन्हा रिपब्लिकन आघाडीच्या प्रयोगाला सुरुवात

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : रिपब्लिकनांचे ऐक्‍य हा आंबेडकरी समाजाचा जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी बहुजन समाज पार्टीकडे अनेक आंबेडकरवाद्यांनी आस्थेने बघितले. परंतु, बसपाने ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ हा नारा दिला आणि आंबेडकरी माणूस बसपपासून दुरावला.

पुढे महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीचा पर्याय दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी राबवला. तो यशस्वी झाला. मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले. काही काळातच आघाडीत बिघाडी झाली. मात्र, तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन आघाडीच्या प्रयोगाला सुरुवात झाली. नामांतर शहीद स्मारकाला अभिवादन करून रिपब्लिकन आघाडी आकाराला आली.

अधिक वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रिंगणात होते दोन अभिजीत वंजारी; पात्र ठरले एकच

महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडी उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शनिवारी (ता. १४) रिपब्लिकन कार्यकर्त्यांची दुसरी बैठक दहा नंबर पुलाजवळच्या नामांतर शाहीद स्मारक येथे बैठक घेतली.

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते विनायकराव जामगडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विविध रिपब्लिकन गटातील कार्यकर्त्यांच्या समावेशातून रिपब्लिकन आघाडी आकाराला आली. सल्लागार समितिमध्ये ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे, विनायक जामगड़े, घनश्याम फुसे, निरंजन वासनिक, शेषराव रोकडे, रावसाहेब ढोके यांचा समावेश आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

तर संयोजन समितीत संजय पाटील, शिरीष धन्द्रवे, दिनेश अंडरसहारे, विशाल गोंडाणे, सचिन गजभिये, विश्वाश पाटील, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, धर्मपाल वंजारी, सुनील जवादे, सिद्धार्थ पाटिल व डॉ मनोज मेश्राम यांचा समावेश आहे. कायदेशील सल्लागार म्हणून मानवेन्द्र आवळे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीत अमर भांगे, प्रफुल तिरपुडे, सुखदेव मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर आदी उपस्थित होते.

रिपाइंची शक्ती

रिपाइंची वज्रमुठ बांधली जाते, त्यावेळी रिपाईची शक्ती दिसून येते इतिहास राहिला आहे. १९९७ च्या निवडणुकीवेळी रिपब्लिकन ऐक्य झाले त्यावेळी १६ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर २००७ मध्ये रिपब्लिकन आघाडी तयार झाल्यानंतर ८ नगरसेवक निवडून आले होते. यामुळे कार्यकर्ते आशावादी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संपादन - नीलेश डाखोरे