esakal | पेट्रोल पंपावरही मिळतात धमक्‍या, कारवाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडाच्या तपासात पेट्रोल पंपावरून बॉटल अथवा कॅनमध्ये घेतलेल्या पेट्रोलचा दुरुपयोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर अशाप्रकारे पेट्रोल देणे बंद केले आहे. सोमवारी (ता. 13) रात्री नवीन सुभेदार येथील पेट्रोलपंपावर आठ ते दहा लोक पांढरी कार व दुचाकीवरून आले. बॉटलमध्ये पेट्रोलची मागणी करू लागले. पंपावरील कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या काही व्यक्तींनी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली आणि जबरदस्तीने पेट्रोल घेणे सुरू केले.

पेट्रोल पंपावरही मिळतात धमक्‍या, कारवाईची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि मालकांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन देऊन केली.

तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडाच्या तपासात पेट्रोल पंपावरून बॉटल अथवा कॅनमध्ये घेतलेल्या पेट्रोलचा दुरुपयोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर अशाप्रकारे पेट्रोल देणे बंद केले आहे. सोमवारी (ता. 13) रात्री नवीन सुभेदार येथील पेट्रोलपंपावर आठ ते दहा लोक पांढरी कार व दुचाकीवरून आले. बॉटलमध्ये पेट्रोलची मागणी करू लागले. पंपावरील कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या काही व्यक्तींनी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली आणि जबरदस्तीने पेट्रोल घेणे सुरू केले. तसेच पंप मालकाला जिवे मारण्याची धमकी दिली आणि सर्वांना मोफत पेट्रोल व डिझेल देण्यास ठणकावले. तसे न केल्यास तुझ्या घराचा पत्ता माहीत आहे.


क्लिक करा - तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच

तुझ्या घरावर हल्ला करू अशी धमकीही दिली. या प्रकरणाची तक्रार सक्करदरा पोलिस ठाण्यात केली. कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले आहे. मात्र, अद्यापही कोणालाही अटक झालेली नाही. अनेक कारणांमुळे पेट्रोल पंपावरील उपद्रवांमध्ये वाढ झाली असून पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. याची तक्रार पोलिस ठाण्यात केल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही निवेदनातून असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी केला आहे. तसेच सामान्य जनतेच्या मनातून गुन्हेगारांबद्दलची भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची शहरातून धिंड काढावी अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा - अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर