तीन कार समोरासमोर धडकल्या; आठ जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

शुक्रवारी सायंकाळी नागपूर-उमरेड महामार्गावरील उटीनजीकच्या कालिमाता मंदिराजवळ एकापाठोपाठ एक अशा तीन भरधाव कारमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये आठ जण किरकोळ जखमी झाले.

चांपा (जि.नागपूर) : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या तीन भरधाव कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे तिन्ही कारमधील कारचालकांसह आठ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली

क्‍लिक करा :   ती ऐकत होती हेडफोनवर गाणे, मृत्यू करीत होता "तिची' प्रतीक्षा 

सुदैवाने जिवीतहानी नाही 
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी नागपूर-उमरेड महामार्गावरील उटीनजीकच्या कालिमाता मंदिराजवळ एकापाठोपाठ एक अशा तीन भरधाव कारमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये आठ जण किरकोळ जखमी झाले. त्यांना औषधोपचाराकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. जखमींमध्ये एमएच 49 बी 9075 या कारमध्ये स्वार असलेले क्रिष्णा बापूराव लाडसे (वय 45, बापूनगर, नागपूर), पुंडलिक दादाराव जोंजळकर (वय 45, योगेश्वरनगर, दिघोरी, नागपूर), प्रशांत खडतकर (वय 40, पवनसुतनगर, उमरेड रोड, नागपूर), एमएच 49 यू 0030 या कारमधील कारचालक अजय कोल्हे(वय 44, राजबाक्षा मेडिकल चौक, नागपूर), संजय यतकर (वय 50, राजबाक्षा मेडिकल चौक, नागपूर), एमएच 35 एजी 6810 या कारमधील संदीप फुंडके (वय 35, अर्जुनी मोरगाव, गोंदिया), भीमसेन फुंडके (वय35, मोरगाव, गोंदिया), गुरुदास जिभकाटे (वय40, सेंदरी पवनी, भंडारा) यांचा समावेश आहे. 

क्‍लिक करा: रानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली 

घटनेची माहिती मिळताच पाचगाव पोलिस चौकीचे पोलिस हवलदार विजय कुमरे, संजय कानडे, पोलिस शिपाई देवेंद्र बुटले घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढून नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आले. पुढील तपास कुही पोलिस करीत आहेत. 
क्‍लिक करा :"ती' ऐकत होती हेडफोनवर गाणे, मृत्यू करीत होता "तिची' प्रतीक्षा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three cars collided face-to-face; Eight were injured