मध्यरात्री दोन वाजता चढली दारू अन् क्षुल्लक कारणावरून झाला वाद, तिघांनी लाकडी दंडुक्‍याने केले वार...

अनिल कांबळे
सोमवार, 25 मे 2020

सुनील मृत झाल्याचे समजून थेट नंदनवन पोलिस ठाणे गाठून स्व:ताला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मेडिकल रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीपान पवार करीत आहे. 

नागपूर : ते मित्र... एकाच वस्तीत राहतात... लॉकडाउनमुळे भेट नाही... थोडी शिथिलता मिळाली अन्‌ त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या... दारूही मिळत असल्याने त्यांनी पार्टीचा बेत आखला... रविवारी चौघांनी मनसोक्‍त दारू ढोसळली... बोलण्या-बोलण्यात त्यांच्यात वाद झाला... वाद विकोपाला गेल्याने एकाचा दांड्याने खून केला... हा थरारक घटनाक्रम नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील ज्ञानेशवर शेंडे (वय 35, रा. गल्ली नंबर 1, नंदनवन झोपडपट्टी), संतोष सुभाष येवले (30), आशीष शामराव बडोले (20) व उमेश अशोक झाडे (29) हे सर्व नंदनवन झोपडपट्टीत राहतात. सर्व जण हात मजुरीचे काम करतात. लॉकडाउनमुळे हातचे काम गेले. म्हणून सर्वजण घरीच राहत होते.

क्लिक करा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

अशात त्यांनी रविवारी पार्टी करण्याचे ठरवले. रविवारी रात्री चौघांनीही सोबत दारू ढोसली. दरम्यान रात्री दोन वाजातच्या सुमारास दारूच्या नशेत तिघांचा सुनीलसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि आरोपींची लाकडी दांड्याने सुनीलच्या डोक्‍यावर व चेहऱ्यावर सपासप प्रहार केला. तिघांनीही सुनीलला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. 

सुनील मृत झाल्याचे समजून थेट नंदनवन पोलिस ठाणे गाठून स्व:ताला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मेडिकल रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीपान पवार करीत आहे.

असे का घडले? - तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमी प्रवास

स्वत:ला केले पोलिसांच्या स्वाधीन

वस्तीत राहणाऱ्या चार मित्रांनी रविवारी रात्री पार्टी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी पार्टीही केली. मात्र, दारू पिण्यावरून झालेल्या वादात तीन मित्रांनी एकाचा लाकडी दांड्याने खून केला. ही थरारक घटना नंदनवन झोपडीपट्टीत रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी सुनीलला मृत झाल्याचे समजूत स्व:ताला पोलिसांच्या स्वाधीन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The three together killed one