गृहिणींनो खुशखबर! हिरवी मिरची आणि टोमॅटोचे भाव घसरले; हे आहेत भाज्यांचे दर 

राजेश रामपूरकर 
Sunday, 24 January 2021

कळमना बाजार आणि महात्मा फुले मार्केट परिसरात सध्या २०० ते २१० भाजीच्या गाड्याची आवक सुरू आहे. मागणी आणि पुरवठा समान असल्याने मिरची आणि टोमॅटोचे भाव कमी झालेले असताना इतरही भाज्यांचे भाव स्थिरावलेले आहेत

नागपूर ः हिरवी मिरची आणि टोमॅटोची आवक अचानक वाढल्याने भावात घसरण झालेली आहे. याशिवाय इतर भाज्यांचे दर स्थिरावलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

कळमना बाजार आणि महात्मा फुले मार्केट परिसरात सध्या २०० ते २१० भाजीच्या गाड्याची आवक सुरू आहे. मागणी आणि पुरवठा समान असल्याने मिरची आणि टोमॅटोचे भाव कमी झालेले असताना इतरही भाज्यांचे भाव स्थिरावलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाज्या खाण्यासाठी सुगीचे दिवस आलेले आहेत. 

हेही वाचा - असाही एक अवलीया... जमीन दान करून केले गरिबांचे स्वप्न पूर्ण; थाटला दहा बेघरांचा संसार

घाऊक बाजारात भावात वाढलेलेच आहेत. दहा रुपये किलो असलेले टोमॅटो किरकोळ बाजारात ३० रुपये किलो तर मेथी चाळीस रुपये किलो दराने विकल्या जात आहे. थंडी कमी होताच भाजीची वाढणार असून भाव घसरण्याची शक्यता आहे असे राम महाजन यांनी सांगितले.

भाजीपाला - दर (रुपये प्रतिकिलो)
वांगे - १५
टोमॅटो- १०
फुलकोबी - १५
पानकोबी - ०८
चवळीच्या शेंगा - ३०
कारले - ३०
गवार शेंगा - ३०
पालक - ७
मेथीची भाजी - ४०

नक्की वाचा -  डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले...

कोहळं - ३०
शिमला मिरची - ४०
कोथिंबीर - २०
भेंडी - ३०
दुधी भोपळा - १०
काकडी - २०
मुळा - १०
गाजर - २०

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tomato and chilly get cheap in Market in Nagpur