मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार

अनिल कांबळे
Friday, 6 November 2020

हितेशने तिला वेळोवेळी मदत करीत जाळ्यात ओढले. काही महिन्यांपूर्वी हितेश तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने नकार देताच मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

नागपूर : पाच वर्षांच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन एका युवकाने महिलेवर बलात्कार केला. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या महिलेने नंदनवन ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश लक्ष्मण आगासे (वय २८, रा. बाबुलबन, गरोबा मैदान, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिला पती आणि पाच वर्षांच्या मुलीसह पूर्व नागपुरात राहते. ती एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात नोकरी करते. २५ फेब्रुवारी २०१८ पासून पिग्मी एजंट असलेला आरोपी हितेश आगासे तिच्या कार्यालयात नेहमी येत होता. यादरम्यान त्याची महिलेशी ओळख झाली. रोज कार्यालयात येणे होत असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. त्याने घरी येणे सुरू केले.

सविस्तर वाचा - Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश

हितेशने तिला वेळोवेळी मदत करीत जाळ्यात ओढले. काही महिन्यांपूर्वी हितेश तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने नकार देताच मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार मुलीला आणि पतीला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करू लागला.

पतीने केली मध्यस्थी

त्याच्या त्रासाला ती कंटाळली होती. कंटाळलेल्या पीडितेने घडलेला प्रकार पतीला सांगितला. यानंतर पतीने हितेशला घरी बोलवून मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, हितेशने समाजात बदनामी करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा - बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

हितेशची केली होती लूटमार

दोन महिन्यांपूर्वी पीडितेने हितेशला फोन करून घरी बोलावले. तो घरी आल्यानंतर पती आणि मित्रांच्या मदतीने हितेशला धमकावले होते. त्याला मारहाण करीत एटीएम कार्ड हिसकावून खात्यातून १३ हजार रुपये काढले होते. याप्रकरणी हितेशने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकही केली होती, अशीही माहिती नंदनवन पोलिसांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture by threatening to kill the girl