नागपूरकरांनो, स्वतःला कोंडून घ्या, नाहीतर आम्ही कोंडणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील फुटाळा तलाव, सेमिनरी हिल, हजारी पहाड, बर्डी, मोमीनपुरा, इतवारी, गोळीबार चौक, महाल, सेंट्रल एव्हेन्यू, कॉटन मार्केट परिसरात दौरा केला. त्यानंतर दुपारी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी शहरातील स्थितीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 'लॉकडाऊन'चा अर्थ नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर दिसून येत आहे.

नागपूर : शहरातील काही भागाचा आज सकाळी दौरा केला. कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला. मात्र दुर्देवाने अजूनही नागरिक घराबाहेर दिसून येत आहे. नागरिकांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व आरोग्यासाठी घरात राहून सहकार्य करावे अन्यथा नागरिकांना सक्तीने घरात डांबून ठेवावे लागेल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील फुटाळा तलाव, सेमिनरी हिल, हजारी पहाड, बर्डी, मोमीनपुरा, इतवारी, गोळीबार चौक, महाल, सेंट्रल एव्हेन्यू, कॉटन मार्केट परिसरात दौरा केला. त्यानंतर दुपारी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी शहरातील स्थितीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 'लॉकडाऊन'चा अर्थ नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर दिसून येत आहे.

यापूर्वीही नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, अशी वारंवार विनंती केली. त्याबाबत गांभीर्य न दाखविल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा कालपासून लागू करण्यात आला. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने कोरोनाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही, अशी खंत आयुक्तांनी व्यक्त केली. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी या सर्व उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेसाठी नियम पाळण्याची गरज आहे. परंतु नागरिक ऐकत नसतील तर सक्तीने त्यांना घरात कोंडावे लागेल, असेही आयुक्त म्हणाले. 31 मार्चपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती कायम राहण्याची गरज असून यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असेही ते म्हणाले.

नागपुरात "लॉकडाउन', आरोग्य सेवा, बॅंक, पेट्रोलपंप, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने सुरू

...तर नागरिकांवर कारवाई 
नागरिक बाहेर पडत आहे, हे योग्य नाही. त्यामुळे नाकाबंदी करण्याचे संकेत त्यांनी दिले. नागरिक बाहेर दिसल्यास पोलिसांकडून त्यांना विचारणा केली जाईल. एवढेच नव्हे तर जमावबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याचीही तयार असल्याचे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe appeal to nagpur citizens