esakal | नागपुरातील सेक्स रॅकेटवर छापा; दोन महिला दलालांना अटक

बोलून बातमी शोधा

Two female brokers arrested from Gittikhadan Nagpur crime news}

देहव्यापार करून दिवसाकाठी ५ ते १० हजार रुपये कमविण्यासाठी प्रेरित केले. सुनीता तिच्या जाळ्यात फसली. दोन तरुणी तिने तयार केल्या. त्यांना एका पुरुषाकडून ३०० रुपयांचे आमिष दिले तर उर्वरित कमाईची सुनीता-कविता यांनी वाटून घेण्याचे ठरले.

nagpur
नागपुरातील सेक्स रॅकेटवर छापा; दोन महिला दलालांना अटक
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गिट्टीखदान परिसरात हजारी पहाडमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी दोन महिला दलालांना अटक केली तर बळजबरी देहव्यापार करवून घेतल्या जाणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता योगिराज टेंभूर्णे (५०, रा. टीव्ही टॉवर) ही महिला दलाल काही वर्षांपासून देहव्यापाराच्या दलदलीचा व्यवसाय करीत होती. ती गरीब आणि आर्थिक अडचणी असणाऱ्या मुलींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून आंबट शौकीनांकडे पाठवत होती. तिला यापूर्वी पोलिसांनी देहव्यापार करताना अटकसुद्धा केली आहे. तिला पती नसल्यामुळे बिनधास्त हा व्यवसाय तरुणींकडून करून घेत होती.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सुनीता सुनील इंगळे (४०, रा. हजारी पहाड) हिच्याशी झाली. सुनीताचा पतीचा मृत्यू झाला असून, घरात लहान मुलगी आणि वृद्ध सासू आहे. कविताने सुनीताला बक्कळ पैसे कमविण्याचे आमिष दाखवले. तिला दोन तरुणी शोधण्यास सांगितले. त्यांच्याकडून देहव्यापार करून दिवसाकाठी ५ ते १० हजार रुपये कमविण्यासाठी प्रेरित केले. सुनीता तिच्या जाळ्यात फसली. दोन तरुणी तिने तयार केल्या. त्यांना एका पुरुषाकडून ३०० रुपयांचे आमिष दिले तर उर्वरित कमाईची सुनीता-कविता यांनी वाटून घेण्याचे ठरले.

अनेक दिवसांपासून त्यांचा गोरखधंदा सुरू होता. रात्री उशिरापर्यंत सुनीताच्या घरात वेगवेगळ्या पुरुषांचा गर्दी होत असल्यामुळे शेजारी कंटाळले. गिट्टीखदान पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी पंटर पाठवून खात्री करून घेतली. शुक्रवारी दुपारी बारा वाजता एक पंटर कविताकडे पाठवला.

तिच्यासोबत सौदा पक्का झाला. त्याने ५,००० हजार रुपये कविताला दिले. त्यानंतर सुनीताने तरुणी पंटरला दाखवल्या. सुनीताच्या रूममध्ये पंटर तरुणीसोबत गेला आणि पोलिसांना इशारा दिला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेच छापा घातला. सुनीता आणि कविताला पोलिसांनी अटक केली तर दोन तरुणींची सुटका केली.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना 

कर्ज फेडण्यासाठी देहव्यापार

देहव्यापार करताना पकडलेल्या तरुणी कपडे विक्रीची व्यवसाय करीत होती. परंतु, लॉकडाऊनमुळे तो व्यवसाय बुडाला. त्यांच्यावर कर्ज असून ते फेडण्यासाठी देहव्यापाराच्या दलदलीत ओढल्या गेल्या. तर दुसरी पतीपासून विभक्त राहत असून, केवळ पैसा कमविण्यासाठी सेक्स रॅकेटमध्ये जुळली आहे. झटपट पैसा मिळविण्यासाठी देहव्यापार करीत असल्याची कबुली पीडितेने दिली.