डॉक्टर तरुणी बघत होती फ्री गिफ्टचे स्वप्न; पण घडला भलताच प्रकार.. वाचा सविस्तर   

two men did fraud with a girl by making fake cals from amazon
two men did fraud with a girl by making fake cals from amazon

नागपूर : आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन शॉपिंगसाठी ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण करत आहे. त्यासाठी अनेक पेमेंट अप्लिकेशनचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये काही फ्री गिफ्ट्सही मिळतात. मात्र प्रत्येकवेळी हे फ्री गिफ्ट्स खरे असतीलच असे नाही. असाच एक फसवणुकीचा प्रकार नागपुरात एका सुशिक्षित तरुणीच्या बाबतीत घडला आहे

ॲमेझॉनच्या प्रमोशनल स्किममध्ये फ्री गिफ्ट लागल्याचे आमीष दाखवून डॉक्टर युवतीची ३० हजाराने फसवणूक करण्याता आल्याचे प्रकरण उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जननी मिलींद सोसायटी, न्यू लुक कॉन्व्हेंटजवळ, नरेंद्रनगर येथील रहिवासी डॉ. स्मृती गुणा शेखर (२८) यांनी घरच्यासाठी अॅमेझॉनच्या वेब साईटवर धावणाऱ्या मशिनची ऑर्डर दिली. १२ सप्टेंबर रोजी ११च्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन केला. अॅमेझॉन प्रमोशन डिपार्टमेंटमधून जया बोलत असल्याची ओळख दिली. त्यानंतर आणखी एक फोन आला. ॲमेझॉनमधून एक्झेकेटीव्ह बोलत असल्याची ओखळ दिली. 

या दोघांनीही अॅमेझॉनच्या प्रमोशन स्किममधील पाच लकी ग्राहकांपैकी तुम्ही एक असल्याचे सांगुन फ्रिज, टिव्ही, एसी, अॅपल कंपनीचा मोर्बाइल फोन यापैकी एक फ्री गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले. सोबतच गिफ्ट मिळण्यासाठी पूर्वीच बूक केलेल्या धावण्याच्या मशीनचे पैसे पेटीएम अकाउंटद्वारे ट्रान्फर करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉ. शेखर यांनी पैसे ट्रान्सफर केले. 

त्यानंतर मात्र आरोपीनी कोणतेही साहित्य पाठविले नाही. त्यांच्या सोबत संपर्कही होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बेलतरोडी ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

 संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com