धक्कादायक! वाळू माफियांची वाढली हिंमत.. पोलिस हवालदारावर चाकूने प्राणघातक हल्ला.. 

सतीश घरड 
Thursday, 17 September 2020

हल्ल्यात जखमी रवी चौधरी वय ४४ वर्षे राहणार खसाडा तालुका कामठी असे पोलिस हवालदाराचे नाव आहे.जखमी हवालदाराची स्थिती गंभीर असून त्याला तात्काळ नागपूर स्थित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नागपूर : पाऊस असो थंडी असो वा उन्हाळा पोलिस आपले कर्तव्य नेहमीच चोखपणे पार पडत असतात. मात्र काही गुन्हेगार स्वतःला पोलिसांपेक्षा मोठे समजतात. अशीच एक घटना समोर आली आहे.  एका पोलिस शिपायाला तारसा रोड गहूहीवरा चौक येथे धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार रात्री ९ :३० च्या सुमाराला घडली. 

जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या

हल्ल्यात जखमी रवी चौधरी वय ४४ वर्षे राहणार खसाडा तालुका कामठी असे पोलिस हवालदाराचे नाव आहे.जखमी हवालदाराची स्थिती गंभीर असून त्याला तात्काळ नागपूर स्थित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वाढता वाळू माफियांचा उद्रेक वाढत चालला आहे. .कन्हान शहरात पोलिसावर झालेल्या हल्ल्याने शहरात पुन्हा एकदा गुंड प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सिहोरा घाटातून अवैध रित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर वाहनावर कार्यवाही केलेली होती, सोबतच हवालदार रवी चौधरी यानी गेल्या काही दिवसांआधी अवैध व्यवसायात लिप्त असलेल्या इसमाच्या भावाला अवैध व्यवसायात लिप्त असल्याच्या संशयावरून ठाण्यात आणून चोप दिलेला होता. 

त्याचाच राग मनात धरून अज्ञात मारेकऱ्यांने बुधवारला रवी याला मारण्याचे नियोजन आखले आणि तारसा रोड गहू हिवरा चौकात रात्री ९:३० च्या सुमारास धारधार चाकूने त्याच्यावर हल्ला चढवून पाय आणि पोटात वार करून घटना स्थळावरून पसार झाला अशी माहिती समोर येतेय. 

काय आहे पितृ पंधरवड्याचे महत्त्व? श्राद्धपक्ष म्हणजे नेमके काय? घ्या जाणून

जखमी अवस्थेत पोलिसांनी रवी याला कामठी स्थित आशा रुग्णालयात नेले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ नागपूर स्थित व्होकार्ट रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळतेय. मात्र अजूनही मुख्य मारेकऱ्याला अटक झालेली नाही. या घटनेमुळे वाळू माफियांची मजल पोलिसांपर्यंत गेली आहे असंच दिसून येतंय. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown man attacked on police in nagpur