कोण म्हणतय चीनवर आर्थिक बहिष्कार टाका, वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे जवळपास 20 सैनिक हुतात्मा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्कराने या बातमीला दुजोरा दिला असून, सोबतच, गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. उंचावर झालेल्या हाणामारीत गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आले. परंतु, तापमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. 

नागपूर : दोन महिन्यापासून चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताला चिथावणी देत आहे. सुरुवातीला काही अंतर मागे सरकलेल्या चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसत सोमवारी हिंसक रूप दाखवून दिले. या घटनेत वीस जवानांना हौतात्म्य आले. विश्‍व हिंदी परिषदेतर्फे या कृत्याचा जाहीर निषेध करत हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले. 

कोरोनामुळे संपूर्ण जगाचा चीनवर रोष आहे. त्यातच भारत सरकारच्या आत्मनिर्भर धोरणामुळे चीनी वस्तुंच्या बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. अशात चीनने हिंसक रूप दाखविल्याने आर्थिक बहिष्कार घाला, चीन निर्मित वस्तुंची खरेदी करू नका, हीच खरी जवानांना श्रद्धांजली ठरेल असे गोविंद शेंडे म्हणाले.

वाचा : हॉटेल्स, बार बंद असल्याने तिकडची वर्दळ वाढली

गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील पॅन्गॉंग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. या भागामध्ये भारताकडून रस्त्यांची कामे सुरू असून, काही धावपट्ट्याही विकसित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. या कामांमुळे पॅन्गॉंग सरोवर आणि परिसरात भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्‍य असल्यामुळे या कामांत अडथळे आणण्यासाठी चीनच्या सैन्याकडून या भागात घुसखोरी सुरू असल्याचं समजतंय.

वाचा : बघा फ्रान्समध्ये गाजला या नागपूरकर तरुणाचा आविष्कार

लष्करी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच, सोमवारी रात्री ही घटना घडली. गलवान खोऱ्यामध्ये चीनचे सैनिक ट्रकमधून आले. त्यांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर ते माघारी जाण्यास तयार नव्हते आणि त्यातूनही घटना घडली. सुमारे दोन ते तीस तास ही चकमक झाल्याचं समजतंय.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vhp says Boycott Chinese goods