अरेरे ! दुहेरी संकटाने बळीराजा "लॉकडाउन'

सुधीर बुटे
Thursday, 26 March 2020

मंगळवारपासून ढगाळ वातावरणामुळे व काही ठिकाणी पाऊस पडल्याने, कापलेला माल ओला झाला. हवामान खात्याने पावसाचा पुढे अंदाज वर्तविला आहे. गारपीट अवकाळी पाऊस व पुढील 21 दिवस अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचा माल कापणीला तर कुणाचा कापून पडला आहे. आसमानी, करोना, संकटासोबत मजूर बाहेर न पडणे आदी समस्या शेतकऱ्यांची पार चिंता वाढवीत आहेत.

काटोल (जि.नागपूर) : दूरदृष्टी व गंभीर पावले लक्षात घेऊन संपूर्ण देश मंगळवारी रात्रीपासून "लॉकडाउन' झाला. सदया हातातोंडाशी आलेला घास हातून जाण्याचे चित्र बळीराजासमोर आहे. सध्या रब्बी पिके गहू, हरभरा आता कापणीचा (सोंगणे) हंगाम सुरू आहे. सोबत मृग बहराचा संत्रा, मोसंबी आदींचा समावेश आहे. करोना जीव घेणाऱ्या व्हायरसचे संक्रमण रोखण्यास कोणीही 21 दिवस घराबाहेर पडू नका, असे कठोर आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री जाहीर करताच शेतकऱ्यांची झोप उडाली. दुहेरी संकट आवासून डोळ्यांसमोर उभे आहे.

क्‍लिक करा : संचारबंदीचा असाही परिणाम...नागपुरच्या प्रदुषणात हे झाले बदल

अस्मानी संकटाने भर
मंगळवारपासून ढगाळ वातावरणामुळे व काही ठिकाणी पाऊस पडल्याने, कापलेला माल ओला झाला. हवामान खात्याने पावसाचा पुढे अंदाज वर्तविला आहे. गारपीट अवकाळी पाऊस व पुढील 21 दिवस अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचा माल कापणीला तर कुणाचा कापून पडला आहे. आसमानी, करोना, संकटासोबत मजूर बाहेर न पडणे आदी समस्या शेतकऱ्यांची पार चिंता वाढवीत आहेत.
अशा परिस्थितीत कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही. कोरोना व्हायरस भयानक संक्रमित असणारा जीवघेणा असल्याची ग्रामीण भागातसुद्धा जनजागृती झाल्याने जनता बाहेर पडायला तयार नाही, किंवा जोखीम स्वीकारत नाही.

क्‍लिक करा : नागपुरातील संशयितांच्या संख्येत घट, पहिला रूग्ण लवकरच घरी जाणार

जीव धोक्‍यात घेऊन शेतावर
नेहमीच्या संकटाशिवाय यावेळी मोठी किंमत मोजावी लागणार, याची माहिती असूनसुद्धा शेतकरी बाहेर पडत आहेत. त्याला कुणी सोबत येवो अथवा न येवो शेतावर जाणेच बांधील झाले आहे. शेतातील गायी बैलजोडीचा चारापाणी कोण करणार, स्वतःचा व परिवाराचा जीव धोक्‍यात ठेवून काम करीत आहे.

क्‍लिक करा : अरे हे काय, आदेश असतानाही कारखाने सुरूच?

गुढी बदलली, पण सालदार मिळेना
गुढीपाडवा शेतीवरील सालदाराचा पहिला दिवस होय. यादिवशी शेतात वर्षभराच्या कामाकरिता कामकरी(सालदार) निश्‍चित करून नवीन वर्षाच्या कामास प्रारंभ करण्याची पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे. यावर्षी "लॉकडाउन'मध्ये गुढीपाडवा आला. सालदार साल ठरवायला आले नाही, तर कामावरसुद्धा "खो' दिला.

क्‍लिक करा: कोरोना विषाणूच्या फाईटसाठी आरोग्य यंत्रणा एकदम सज्ज

बळीराजाला मदत जाहीर करावी
करोनामध्ये शेतमजूर, कामगार, रोजगार सर्वांचा विचार केला जात असून त्यांना मदत म्हणून मासिक वेतन देण्याचे जाहीर झाले आहे. सर्वांची सदैव चिंता अंगावर घेणाऱ्या बळीराजा शेतकऱ्यांचा जरूर विचार व्हावा अशी मागणी पुढे येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victims 'lockdown' with double crisis