esakal | स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार, नागरिकांचा तहसील कार्यालयात ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

villagers agitation against ration shopkeeper in parshivani of nagpur

दुकानदाराकडून अनेकदा धान्यवाटप केले जात नाही. धान्य कमी देणे, ग्राहकांना उलटसुलट बोलणे, अनेकांना गहू न देता तांदूळच देणे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. बनाबाई कुभरे यांना 35 किलो धान्य द्यायचे असताना केवळ पाच किलो धान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.

स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार, नागरिकांचा तहसील कार्यालयात ठिय्या

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

पारशिवनी : तालुक्यातील चारगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या वागणुकीला कंटाळून तसेच होत असलेल्या धान्य काळाबाजाराबाबत नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार केली. परंतु, संबंधितांविरुद्ध काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागासमोर दारातच ठिय्या आंदोलन केले. 

हेही वाचा - Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

दुकानदाराकडून अनेकदा धान्यवाटप केले जात नाही. धान्य कमी देणे, ग्राहकांना उलटसुलट बोलणे, अनेकांना गहू न देता तांदूळच देणे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. बनाबाई कुभरे यांना 35 किलो धान्य द्यायचे असताना केवळ पाच किलो धान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ग्राहकांनी संबंधित विभागाकडे दुकानदाराविरोधात तक्रारी केल्या. परंतु, कारवाई होत नसल्याने नागरिकांनी रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. दुकानदाराविरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत दारातच बसून राहण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. 

हेही वाचा - आमदार रवी राणांची दिवाळी तुरुंगात; सोळा कार्यकर्त्यांनाही सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

नागरिकांचा रोष पाहता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई करणयाचे मान्य केले. तसे लेखी पत्रही दिले. यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे, तालुका प्रमुख आकाश दिवटे, तालुका उपाध्यक्ष राधेश्याम नखाते, शेखर राऊत, अभिषेक एकूणकर, राज चव्हाण, कवडू गद्रे, संदीप शिंदे आदी सहभागी झाले. 

आमच्या विभागाला या दुकानदाराविरोधात तक्रारी मिळाल्या. लागलीच याबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीत अनियमितता दिसून आली. याबाबत संबंधित दुकानदाराला पत्र देऊन महाराष्ट्र शेडयुल कमोडिटीज रेगयुलेशन 1975 च्या कलम 18(2) तरतुदीचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित दुकानदाराला पत्र देऊन कारवाई करण्याची तंबी दिली. 
-भास्कर तोयडे, जिल्हा पुरवठा अधिकारी