नागपूरकरांनो, आजच साठवूण ठेवा पाणी; नऊ लाखांवर नागरिकांना फटका बसणार

Water supply to be cut off in three zones tomorrow
Water supply to be cut off in three zones tomorrow

नागपूर : सेमिनरी हिल्स येथे मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व दुरुस्तीच्या कामासाठी लक्ष्मीनगर, गांधीबाग, धरमपेठ झोनसह चिचभवन जलकुंभाचा पाणीपुरवठा सोमवारी, ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहे. त्यामुळे नऊ लाखांवर नागरिकांना फटका बसणार आहे. याशिवाय प्रतापनगर जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असल्याने या भागातील नागरिकांनाही पाणीपुरवठा होणार नाही.

मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्वला गळती लागल्याने पाण्याच्या प्रवाहासाठी आवश्यक दाब कमी झाला. महापालिका व ओसीडब्लूने या व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी ९ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजतापासून धरमपेठ, लक्ष्मीनगर, गांधीबाग झोनचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सोमवारी धरमपेठ झोनअंतर्गत फुटाळा, रामनगराचे दोन्ही जलकुंभ, सेमिनरी हिल्सवरील दोन्ही जलकुंभाअंतर्गत वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही.

याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर जुने जलकुंभ, टाकळी सिम जलकुंभ, गायत्रीनगर, जयताळा तर गांधीबाग झोनमधील महाल जलकुंभ, सीताबर्डी किल्ला येथील तिन्ही जलकुंभाअंतर्गत वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. चिचभवन जलकुंभाअंतर्गत मनीषनगर, न्यू मनीषनगर, दशरथनगर, दुर्गा सोसायटी, शिल्पा सोसायटी, चिरंजीवीनगर, इंगोलेनगर, जय हिंद सोसायटी, बालपांडे ले-आऊटमध्ये पाणी मिळणार नाही. गिट्टीखदान परिसरातील जाफरनगर, बोरगाव, कुतुबशहानगर, पेंशननगर, आदर्श कॉलनी, सादिकाबाद कॉलनी, गांधी ले-आऊट, अयप्पानगर, मानकापूर, उत्थाननगर, इंद्रायणीनगर, बरडेनगरातही पाणीपुरवठा होणार नाही.

प्रतापनगर जलकुंभाची स्वच्छताही केली जाणार आहे. त्यामुळे सिंधी कॉलनी, व्यंकटेशनगर, कोतवालनगर, मिलिंदनगर, हावरे ले-आऊट, रवींद्रनगर, टेलिकॉमनगर, पूनम विहार, दीनदयालनगर, सरस्वती विहार, लोकसेवानगर, सरोदेनगर, खामला जुनी वस्ती, शास्त्री ले-आऊट, स्वरूपनगर, त्रिशरणनगर, एऩआयटी ले-आऊट, शांतीनिकेतन कॉलनी, सेन्ट्रल एक्साइज कॉलनी, श्यामनगर, गौतमनगर, शिवनगर या वस्त्यांमध्ये नळ कोरडे राहतील.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com