हम होंगे कामयाब...एक दिन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

वयोमानानुसार शिक्षणाप्रतीची ओढ कमी होत जाते. सातत्याने 30 वर्ष काम केल्यानंतर आलेल्या सेवानिवृत्तीच्या जीवनात आराम करण्याची अनेकांची वृत्ती असते. मात्र, आयुष्यात कधीच सेवानिवृत्त व्हायचे नाही, असे ठरवून उरलेला वेळ संशोधनात घालवित त्यात स्वत:ला झोकून देण्याचे काम श्रीचंद्र श्रीवास्तव यांनी केले. वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक बंधनांनाही त्यांनी जुमानले नाही. सातत्याने संशोधन करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी 1982 साली पीएच. डी. करण्याचा पहिला प्रयत्न केला.

नागपूर : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. अनेक जण कामाच्या व्यापामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षण घेतच असतात. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आईबीएम) येथून सेवानिवृत्त झालेले श्रीचंद्र श्रीवास्तव हेसुद्धा त्यातील एक ठरले. वयाच्या 58 वर्षानंतर पीएच.डी. मिळवण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. सध्या ते 78 वर्षांचे आहेत. नागपूर विद्यापीठाच्या 107 व्या दीक्षान्त समारंभात त्यांचा पीएच.डी.ने सन्मानित करण्यात येणार आहे.

हे वाचाच - तीन मुलांच्या आईला प्रियकराने धोका दिला; आणि झाले विपरित

वयोमानानुसार शिक्षणाप्रतीची ओढ कमी होत जाते. सातत्याने 30 वर्ष काम केल्यानंतर आलेल्या सेवानिवृत्तीच्या जीवनात आराम करण्याची अनेकांची वृत्ती असते. मात्र, आयुष्यात कधीच सेवानिवृत्त व्हायचे नाही, असे ठरवून उरलेला वेळ संशोधनात घालवित त्यात स्वत:ला झोकून देण्याचे काम श्रीचंद्र श्रीवास्तव यांनी केले. वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक बंधनांनाही त्यांनी जुमानले नाही. सातत्याने संशोधन करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी 1982 साली पीएच. डी. करण्याचा पहिला प्रयत्न केला. यावेळी एलआयटीचे प्रो. एस. पी. संगल यांच्या मार्गदर्शनात संशोधनाचे काम सुरू केले. मात्र, नोकरीच्या व्यस्ततेतून हे काम अपूर्णच राहीले. शिवाय हिंद महासागरात पोस्टिंग नियुक्ती झाल्याने त्यात मागेच पडत गेलेत. यानंतर त्यांनी नेदरलॅन्ड आणि फ्रान्स येथे प्रशिक्षण प्राप्त केले. त्यामुळे पीएच.डी. करण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला. मात्र, सेवानिवृत्तीनंतर श्रीचंद्र श्रीवास्तव यांनी भूगर्भशास्त्र विभागात "व्हिजिटिंग फॅकल्टी' म्हणून शिकविण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांची विद्यार्थिनी असलेल्‌ प्रो. अलका हुमने यांनीच त्यांना पीएच.डी. पूर्ण करण्याचा आग्रह धरला. त्यातून प्रो. एल.जे. पालिवाल यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सुरूवात करीत तो पूर्ण केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will succeed ... one day