esakal | कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस, मेंदूच्या समस्या; मात्र, पोस्ट कोव्हिड सेंटरचा पत्ता नाही
sakal

बोलून बातमी शोधा

What happened to the Post Covid Center

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड केअर सेंटरअंतर्गत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार केले आहेत. नागपूरच्या एम्समध्येही ही सोय आहे. विशेष असे की, काही खासगी रुग्णालयांनी पोस्ट कोव्हिड सेंटर उभारले आहेत. मात्र अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाला पोस्ट कोव्हिड सेंटर उभारण्याचे सुचले नाही.

कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस, मेंदूच्या समस्या; मात्र, पोस्ट कोव्हिड सेंटरचा पत्ता नाही

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकीय क्षेत्र सांगते. तरीही कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु, सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेचा आरोग्य विभाग या सेंटरबाबत उदासीन असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेकांना फुप्फुस, किडनी आणि हृदयाचे विकार जडत आहेत. काहींना मानसिक आजार होत आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित जिल्हा, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात पोस्ट कोव्हिड सेंटर निर्माण करण्याची गरज आहे.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

नागपुरातील मेडिकलमध्ये पहिले पोस्ट कोव्हिड सेंटर महिनाभरापूर्वी उभारण्यात आले असून, पोस्ट कोव्हिड बाह्यरुग्ण विभागही उभारला. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित रुग्णालये मात्र पोस्ट कोव्हिड सेंटरपासून अद्यापही दूर आहेत. यामुळे राज्य शासनाच्याच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या दोन विभागात दोन वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळत असल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड केअर सेंटरअंतर्गत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग तयार केले आहेत. नागपूरच्या एम्समध्येही ही सोय आहे. विशेष असे की, काही खासगी रुग्णालयांनी पोस्ट कोव्हिड सेंटर उभारले आहेत. मात्र अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाला पोस्ट कोव्हिड सेंटर उभारण्याचे सुचले नाही.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

यासंदर्भात आरोग्य विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता नाव न सांगण्याच्या अटीवर पोस्ट कोव्हिड सेंटरची सुविधा अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १४ ऑक्टोबरपर्यंत सुमारे १६ लाख कोरोनाबाधितांची संख्या आहे. यातील १४ लाख व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद आहे.

का आहे गरज?

अद्ययावत पोस्ट कोव्हिड सेंटरमध्ये आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ आदींचा समावेश पाहिजे. यामुळे कोरोनामुक्तांना पुढील काळात होणारे त्रास, मानसिक आजार, विविध विकारापासून बचाव करण्यासाठी पोस्ट कोव्हिड सेंटरची आवश्यकता असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे मत आहे.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत उपचार
कोरोनातून बरे झालेल्यांसाठी पोस्ट कोव्हिड सेंटरची गरज आहे. राज्यभरातील डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पोस्ट कोव्हिड सेंटर तयार करण्यात येतील. सध्या कोरोनातून बरे झालेल्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत उपचार होत आहेत.
- डॉ. अर्चना पाटील,
आरोग्य संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र.

संपादन - नीलेश डाखोरे