Video : 'झुंड'चे नायक का झाले 'मूकनायक'? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

केंद्र सरकारने देशातील शांती भंग केली आहे.त्यांच्या आंदोलनाला रिपा, महाविदर्भ जनशक्ती मोर्चा, सावित्रीबाई फुले वूमन वेल्फेअर असोसिएशन , सुगत जेसीज, आदिवासी विकास मंच, भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन , ओबीसी विकास मंच यांनी पाठिंबा दिला आहे.

नागपूर : जेएनयूमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 'झुंड'चे नायक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे. संविधान चौकामध्ये गेल्या ​तीन दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

या आंदोलनाला नागपूर शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो आहे. झुंड सिनेमामुळे अल्पावधीतच देशभर प्रसिद्धीस आलेले प्राध्यापक विजय बारसे अतिशय संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी अलीकडेच नागपूर शहरातील क्रीडांगणे वाचविण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात दरम्यान आंदोलन केले होते.

हेही वाचा -मी बॅंक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन...

झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेेतून पुढे आले

'लोकर'च्या माध्यमातून 'झोपडपट्टी फुटबॉल'च्या स्पर्धा सुरू करून जगभरात सुपरहिरो ठरले. प्राध्यापक विजय बारसे यांच्या या आंदोलनस्थळी आज नागपूर शहरातील महिलांनी भेट दिली. आणि त्याही त्यांच्या मौनव्रत आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. 

आमदार विकास ठाकरे यांनी दिली भेट

नागपूर शहरातील आमदार विकास ठाकरे यांनीसुद्धा आज त्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन काही वेळ मौनव्रत धारण केले. जेएनयूतील  भ्याड हल्ल्याचा अहिंसात्मक पद्धतीने निषेध नोंदविला. त्यांच्या या आंदोलनात पाठिंबा यंशवंत तेलंग,तन्वीर अहमद,प्रसन्ना खरात,अमन गुप्ता, प्रेमदास चंहादे यांनी पाठिंबा दिला असून या

क्लिक करा - कॉक्‍लियर इन्प्लान्टची किंमत कमी होईल : नितीन गडकरी 

आंदोलनात सहभागी झाले.

केंद्र सरकारने देशातील शांती भंग केली आहे.त्यांच्या आंदोलनाला रिपा, महाविदर्भ जनशक्ती मोर्चा, सावित्रीबाई फुले वूमन वेल्फेअर असोसिएशन , सुगत जेसीज, आदिवासी विकास मंच, भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन , ओबीसी विकास मंच यांनी पाठिंबा दिला आहे.

प्रा. बारसे यांची झुंडमध्ये ​अमिताभ बच्चन यांनी साकारली भूमिका

नागराज मंजुळे यांनी नागपूर येथे त्यांच्या बायोपिकचे गेल्यावर्षी शूटिंग केले. दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी प्राध्यापक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did pro. Barse protest in nagpur