"या' घाणेरडया प्राण्यांना आवडतात बरं का ! स्वच्छ, सुंदर शहरे, ही आहेत कारणे....

mauda
mauda

नागपूर जिल्हा  : संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी ग्राम स्वच्छता स्पर्धा आदी महापुरूषांच्या नावाने अभियानाला नावे ठेवण्यात येतात. गावे व शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जातात. स्वच्छ, सुंदर गावांना पारितोषिके देउन जनतेला स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केले जाते. परंतू हे फार काळ राहात नाही, असे खेदाने म्हणावे लागते. स्वच्छता स्पर्धेत अव्वल आलेल्या स्वच्छतेला ग्रहण लागते. जागोजागी कच-यांचे ढिग, घाण बघायला मिळते. मग या अस्वस्वछतेवर हे प्राणी तुटून पडतात. त्यांची अस्वच्छतेवरच उपजिवीका चालत असल्यामुळे "ते' येथे ठाण मांडून बसतात.

अधिक वाचा : मोबाईलसाठी रूसली आणि जीव गमावून बसली...

ही आहेत कारणे "त्यांच्या' निवासाची...
मागील काही दिवसात मौदा शहरातील अर्जुनगर, प्रगतीनगर, शिवनगर, स्नेह नगर व इतर नगरात डुकारांचा मुक्तसंचार वाढल्यामुळे वस्तीरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पण नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वस्तीतील नागरिकांनी केला आहे.
वस्त्यांमध्ये अनेक भूखंड खाली असून पावसाळ्याच्या दिवसात या भूखंडाच्या खोलगट भागात पावसाचे पाणी संचयन होते. तसेच त्या ठिकाणी पाणथळ वनस्पती आणि गवताची झुडपे तयार झाल्यामुळे तेथे डुकरांनी निवासस्थान बनविले आहेत. या प्रकारामुळे या वस्त्यात साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांपूर्वी मौदा शहरात डुकरांचा मोठ्‌या प्रमाणात हैदोस होता. परंतू तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी विविध उपाययोजना करून मौदा शहर "वराहमुक्त' केले होते. परंतु मागील काही महिन्यांच्या काळात मौदा शहरात पुन्हा विविध वस्त्यात या डुकराची संख्या वाढताना दिसत आहे. यावर नगर पंचायतीने त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा ही समस्या आणखी बिकट होण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे आज मौदा शहरात वाढत असलेली डुकराची संख्या मात्र स्वच्छ, सुंदर आणि पुरस्कार प्राप्त मौदा शहराला लागलेले ग्रहण आहे.

अधिक वाचा :आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी खेळू नको रे....नाही तर तू पण...

खाली भूखंडात वावर
मौदा वस्तीत अनेक लोकांनी खाली भूखंड घेऊन ठेवले आहेत. त्यात झाडे व गवताचे साम्राज्य आहे. त्यामुळे डुकरांच्या वस्तीत हैदोस वाढत आहे. नगरपंचायत शासनाने खाली भूखंडधारकांना भूखंड स्वच्छ ठेवावे, अशा नोटीस द्याव्या, अन्यथा त्यांच्यावर दंड आकारावा अशी नागरिकांची मागणी आहे.

अधिक वाचा :  "महाराष्ट्रातही सरकार पाडण्याच्या हालचाली, पण...'

वानाडोंगरी करणार "वराहमुक्‍त'
दोन महिण्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये वानाडोंगरी नगरपरिषदेला डुक्करमुक्त करण्याचे आश्वासन वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी दिले होते. दोन दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरु झाली असून दोन दिवसात शंभर डुकरांना पकडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी दिली. वानाडोंगरी नगरपरिषद परिसरामध्ये अनेक लोकांनी प्लाट खरेदी केलेले आहेत. पण त्या प्लाटवर घरे बांधलेली नसल्यामुळे घरगुती वापरले जाणारे सांडपाणी जमा झालेले असते. त्या साचलेल्या पाण्याच्या डबक्‍यात डुकरांचा वावर असतो. त्यामुळे विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले बघायला मिळते. गावातील नागरिकांनी गावातील डुकरांचा बंदोबस्त लावण्याची मागणी लावून धरली होती. मुख्याधिकारी भारत नंदनवार हे पारशिवनीला असताना तेथे सुद्धा त्यांनी ही मोहिम राबविली होती. हाच "पारशिवनी पॅटर्न' वानाडोंगरीमध्ये राबविण्यात येत आहे. डुकरांना पकडण्याचा करार करण्यात आलेला असून पकडलेल्या डुकरांना मध्यप्रदेशात सोडले जाणार आहे. दोन दिवसात शंभरपेक्षा अधिक डुकरांना पकडण्यात आले आहे. काही दिवसातच वानाडोंगरी नगरपरिषद ही "डुक्करमुक्त' होणार आहे.

                                                                                          संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com